Promotional Campaign for CWC 2023: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या व्हिडिओमध्ये इम्रान खानचा समावेश न करण्याच्या प्रकरणात सतत अडकत आहे. आता माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने आपल्याच बोर्डावर निशाणा साधला आहे. आफ्रिदी म्हणाला की, राजकारणाचा क्रिकेटवर प्रभाव पडू नये. त्याने पाकिस्तानच्या नवीन व्हिडीओचे चांगला वर्ल्ड कप प्रमोशनल व्हिडीओ असे वर्णन केले आहे, ज्यामध्ये इम्रान खान ट्रॉफीसोबत दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीसीबीच्या पहिल्या प्रमोशनल व्हिडीओ टीका झाल्यानंतर नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. शाहिद आफ्रिदीने पीसीबीचा नवीन व्हिडीओ पुन्हा शेअर करत लिहिले, “ही आता क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी एक चांगली मोहीम आहे. क्रिकेट जगतातील आमच्या नायकांच्या सेवांवर कोणत्याही राजकीय भूमिकेचा कधीही परिणाम होऊ नये.”

काय प्रकरण आहे?

पीसीबीने १४ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक भावनिक डॉक्युमेंटरी व्हिडिओ जारी केला होता. पीसीबीने देशाच्या क्रिकेट इतिहासात दिग्गजांचे अमूल्य योगदान दाखवले होते. या व्हिडीओमध्ये १९५२ मध्ये पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण ते २०२२ च्या टी-२० विश्वचषकापर्यंतच्या आठवणी दाखवण्यात आल्या होत्या, मात्र १९९२ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या कर्णधार इम्रान खानला वगळले होते. त्यामुळे पीसीबीवर बरीच टीका झाली होती. आता पीसीबीने आपली चूक मान्य करत एक नवीन व्हिडीओ जारी केला आहे, ज्यामध्ये इम्रान खानचा समावेश आहे.

पीसीबीने चूक मान्य करताना काय म्हटले?

पीसीबीने एक्सवर (ट्विटर) लिहिले, “पीसीबीने क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी प्रचार मोहीम सुरू केली आहे. १४ ऑगस्ट २०२३ रोजी एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ लांबीमुळे कापला गेला होता आणि काही महत्त्वाच्या क्लिप गहाळ झाल्या होत्या. व्हिडिओच्या पूर्ण आवृत्तीमध्ये हे व्यवस्थित केले गेले आहे.”

हेही वाचा – IND vs PAK: भारताविरुद्ध खोट्या बातम्या पसरवल्याने पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू संतापला, बंदी घालण्याची केली मागणी

वसीम अक्रमने पीसीबीवर केली होती टीका –

पीसीबीवर टीका करताना, वसीम अक्रमने एक्सवर लिहिले होते की, लांब उड्डाण आणि अनेक तासांच्या प्रवासानंतर श्रीलंकेत पोहोचल्यावर, मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला जेव्हा मी पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील महान इम्रान खानला पीसीबीच्या क्लिप वगळल्याचे पाहिले. राजकीय मतभेद वेगळे, पण इम्रान खान हे जागतिक क्रिकेटचे आयकॉन आहेत. त्यांनी त्यांच्या काळात पाकिस्तानला एक मजबूत अस्तित्व म्हणून विकसित केले आणि आपल्या त्यातून मार्ग दाखवले. पीसीबीने व्हिडिओ हटवून माफी मागावी.” त्यानंतर आता पीसीबीने नवीन व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid afridi told pcb that politics should not influence cricket vbm