Iftikhar Ahmed upset over false statement against India: पाकिस्तानी संघाचा स्फोटक फलंदाज इफ्तिखार अहमदने भारताविरुद्धच्या एका खोट्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर, रिपोर्टर असल्याचा दावा करणार्‍या एका युजर्सने सांगितले की, इफ्तिखार अहमदने भारतीय संघाबाबत असे विधान केले की, भारताविरुद्ध खेळताना तो रस्त्यावर लहान मुलांसोबत खेळत असल्यासारखे वाटते.

पाकिस्तानी फलंदाजाचे हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर इफ्तिखारने स्वतः पुढे येऊन सत्य सांगितले. इफ्तिखारने ट्विट करताना संपूर्ण विधान खोटे असल्याचे म्हटले आहे, तसेच त्याने चाहत्यांना या युजर्सची तक्रार करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून त्याच्यावर बंदी घालता येईल. इफ्तिखारने ट्विटमध्ये लिहिले की, “मला या विधानाबद्दल सांगण्यात आले, जे मी कधीही केले नाही. वास्तविक कोणताही व्यावसायिक खेळाडू असे विधान करू शकत नाही. कृपया खोट्या बातम्या पसरवणे थांबवा आणि या व्यक्तीची तक्रार करा.” त्याचबरोबर या ट्विटमध्ये एलॉन मस्कलाही टॅग केले आहे.

nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण

हेही वाचा – Prithvi Shaw: “कधी-कधी नशिबाशी लढणं आपल्यासाठी…”; पृथ्वी शॉच्या दुखापतीबद्दल आकाश चोप्राचे वक्तव्य

इफ्तिखार अहमदच्या या पोस्टनंतर, त्या ट्विटर युजरला ब्ल्यू टिक मिळाली. त्यानंतर त्याने लगेच त्याच्या अकाउंटवरून ही पोस्ट डिलीट केली. गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० वर्ल्ड कपचा रोमांचक सामना खेळला गेला होता, तेव्हा इफ्तिखार अहमद पाक संघाचा भाग होता. त्याने या सामन्यात ३४ चेंडूत ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळीही खेळली होती.

हेही वाचा – VIDEO: “आज माझे आणि आईचे स्वप्न साकार…”; टीम इंडियाच्या फ्लाईटमध्ये बसताच रिंकू सिंगने केला आईला कॉल

आशिया कपमध्ये भारत-पाक येणार आमनेसामने –

बऱ्याच कालावधीनंतर २ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर ५० षटकांच्या फॉर्मेटमधील सामना पाहायला मिळणार आहे. आशिया कपमध्ये होणाऱ्या या सामन्याची तमाम क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय सुपर-४ स्पर्धेत आणि त्यानंतर अंतिम फेरीतही दोन्ही संघांमध्ये सामना होऊ शकतो.