भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. आता १ ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताला सराव करण्याच्या दृष्टीने चांगला वेळ मिळाला आहे. पण या बरोबरच काही क्रिकेटपटू आपल्या कुटुंबासोबत आणि जोडीदारासोबत लंडनमध्ये फेरफटका मारण्यास प्राधान्य देत आहेत.

व्यस्त वेळापत्रकातून आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी शिखर धवन कायम तयार असतो. त्याप्रमाणे दोन मालिकांमध्ये मिळालेल्या वेळेत धवन आपल्या पत्नीबरोबर आणि मुलांबरोबर लंडनमध्ये फेरफटका मारणे पसंत केले. धवन कुटुंबाबरोबर फिरताना धवनच्या म्हणण्यानुसार त्याला दोन अनोळखी व्यक्ती भेटल्या. त्यादेखील तेथे फेरफटका मारत होत्या. इतकेच नव्हे तर त्याने त्यांच्याबरोबर फोटो काढून ट्विटही केला. त्याने ट्विट केलेल्या फोटोमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दिसत आहेत. पण धवनने मुद्दाम त्यांना अनोळखी संबोधले आहे.

दरम्यान, त्यानंतर विराटनेही अनुष्कासोबत काही निवांत क्षण घालवतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोत हे दोघे गाडीतून इंग्लंमधील रस्त्यांवर फेरफटका मारताना दिसत आहेत.

दरम्यान, १ अॉगस्टपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे.