भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शुबमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचबरोबर १२.१ षटकांत ६६ धावांवर न्यूझीलंडचा डाव गुंडाळताना १६८ धावांनी विजयाची नोंद केली. शुबमनने शतकी खेळी करताना विराट रोहित आणि रैनासारख्या खेळाडूंना मागे सोडताना अनेक विक्रमांना गवसणी घातली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारा शुबमन सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्याचबरोबर गिल तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडूदेखील ठरला. शुबमन गिलने ६३ चेंडूचा सामना करताना १२६ धावांची नाबाद खेळी केली. ज्यामध्ये त्याने १२ चौकार आणि ७ षटकार लगावले. त्याचबरोबर भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने विजय मिळवला.

गिलने दिग्गजांना मागे सोडले –

शुबमन गिलच्या आधी सुरेश रैना हा टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज होता. या माजी डावखुऱ्याने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २३ वर्षे १५६ दिवसांचा असताना शतक झळकावले होते. १३ वर्षे या विक्रमावर राज्य केल्यानंतर शुबमन गिलने २३ वर्षे १४६ दिवस वय असताना शतक झळकावून रैनाकडून हा विक्रम हिरावून घेतला.

भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज –

शुबमन गिल भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. गिलच्या आधी केवळ चार भारतीय खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे. या यादीत रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना आणि केएल राहुल यांचे नाव आहे. जागतिक क्रिकेटबद्दल बोलायचे, तर सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा गिल हा दुसरा युवा क्रिकेटपटू ठरला आहे. हा विक्रम सध्या पाकिस्तानच्या अहमद शहजादच्या नावावर आहे, ज्याने वयाच्या २२ वर्षे १२७ दिवसांत हा पराक्रम केला आहे.

हेही वाचा – IND vs NZ 3rd T20: शुबमनचे शतक-हार्दिकचा जलवा! भारताने न्यूझीलंडचा १६८ धावांनी उडवला धुव्वा, मालिका २-१ने खिशात

सामन्याबद्दल बोलायचे, तर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद २३४ धावा केल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलंड संघाला २३५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. न्यूझीलंड संघाचा डाव १२.१ षटकांत ६६ धावांवर गडगडला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill scored a century in the 3rd t20 against nz virat kohli broke the record of rohit sharma suresh raina vbm
First published on: 02-02-2023 at 12:52 IST