Fans Tease Shubman Gill: तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने विश्वविक्रमी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना ३९० धावा कुटल्यानंतर श्रीलंकेला केवळ ७३ धावांत गुंडाळत टीम इंडियाने धावांच्या दृष्टीने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने श्रीलंकेला ३१७ धावांनी पराभूत केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुठल्याही संघाने तीनशेहून अधिक धावांनी विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताकडून मोहम्मद सिराजने भेदक मारा करत चार बळी टिपले. तर विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी शतके फटकावली. पण त्याच सामन्यामध्ये शुबमन गिल च्या बाजूला क्षेत्ररक्षण करत होता तिथे वेगळीच घटना घडली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने सामना जिंकल्यानंतर विराटला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. असे असले, तरीही तिरुवनंतपुरम येथे पार पडलेल्या या सामन्यात शुबमन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. कालच्या सामन्यादरम्यान झालं असं की ज्या ठिकाणी शुबमन गिल क्षेत्ररक्षण करत होता त्या ठिकाणी स्टेडियम मधील चाहत्यांनी अचानक “सारा-सारा, सारा-सारा” अशा घोषणा देण्यास सुरुवात केली आणि एकप्रकारे त्याची चेष्टा-मस्करी करण्याचा प्रयत्न केला गेला. पण यावर त्यानेही हसून प्रतिक्रिया दिली.

कालच्या सामन्यातील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून चाहते यावर मजेशीर कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला. खरं तर, सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली आहे की, शुबमन गिल आणि सारा अली खान हे एकमेकांना डेट करत आहेत. कारण दोघेही काही दिवसांपूर्वी एकत्र स्पॉट झाले होते. काही मीडियातील वृत्तांनुसार, गिलचे नाव ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर याच्याशीही जोडले गेले आहे. सचिनची मुलगी सारा तेंडूलकरने काही दिवसांपूर्वीच इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉंलो केले आहे.

हेही वाचा: Hundred Centuries: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम कधी मोडेल? गावसकरांनी केली भविष्यवाणी

कॉफी विथ करण कार्यक्रमात त्यांनी यावर भाष्य केलं होत

शुबमन गिलला डेट करण्याबाबत साराकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दोघेही त्यांच्या अफेअरला कधी पुष्टी देतील याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे याआधी सारा अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करत होती. दोघांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्याचवेळी ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये सारा-कार्तिकच्या अफेअरची पुष्टी झाली. पण आता दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill which sara exactly the fans started teasing as soon as centurion gill came to field video went viral avw