टी २० वर्ल्डकपमध्ये रोज नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहे. तसेच मोठे उलटफेरही पाहायला मिळत आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड संघाने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे. मात्र इतर दोन संघांबाबतचं गणित अद्याप सुटलेलं नाही. दुसरीकडे टी २० वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान खेळाडूंचे वेगवेगळे अंदाज पाहायला मिळत आहेत. आयसीसीने बुमराह सारखी गोलंदाजी शैली असलेल्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजाचा व्हिडिओ शेअर केला आहे. अफगाणिस्तानचा नवीन उल हक हा जसप्रीत बुमराहसारखी गोलंदाजी करत आहे. व्हिडिओत दोघांची गोलंदाजीची शैली दाखवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताविरुद्धच्या सामन्यात नवीन उल हकची षटकं खूपच महागडी ठरली. त्याने चार षटकात ५९ धावा दिल्या. तसेच एकही गडी बाद करता आला नाही. दुसरीकडे बुमराहने अफगाणिस्तान विरूद्ध चांगली गोलंदाजी करत ४ षटकात १ गडी बाद करत २५ धावा दिल्या. २३ वर्षीय नवीन उल हक आतापर्यंत १२ टी २० आणि ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर १४, तर टी २० मध्ये १८ गडी बाद केले आहेत. जसप्रीत बुमराह हा अनुभवी गोलंदाज आहे. ५३ आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात त्याने ६२ गडी बाद केले आहेत. तर ६७ एकदिवसीय सामन्यात १०८ आणि २४ कसोटी सामन्यात १०१ गडी बाद केले आहेत.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना
रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची अर्धशतके, तर हार्दिक पंड्या-ऋषभ पंत यांनी काढलेल्या झटपट धावांमुळे भारताने अफगाणिस्तानसमोर २११ धावांचे आव्हान ठेवले होते. रोहित-राहुलने सलामीला येत १४० धावांची भागीदारी रचली. तर पंड्या-पंत यांनी शेवटच्या २१ चेंडूत तब्बल ६३ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी स्फोटक फटकेबाजी केली, पण भारताच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. २० षटकात अफगाणिस्तानला ७ बाद १४४ धावांपर्यंतच पोहोचता आले. रोहित सामनावीर ठरला. या विजयासह भारताने आपल्या गुणांचे खाते उघडले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc afg bowler naveen ul haq same action like bumrah rmt
First published on: 05-11-2021 at 18:01 IST