PAK vs NZ Semi-Final Highlights : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने बाबर-रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरला. या सामन्यात न्यूझीलंड प्रथम खेळताना न्यूझीलंड संघान १५३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १९.१ षटकांत ३ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला जात आहे. हा सामना सिडनी येथे पार पडत आहे. या सामन्यात केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने २० षटकांत ४ बाद १५२ धावा केल्या आहेत. पाकिस्तानला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी १५३ धावा करायच्या आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. संघाला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. फिन अॅलनच्या (४) रुपाने पहिल्या षटकात झटका बसला आहे. त्याला शाहीन शाह आफ्रिदीने पायचित केले. त्यानंतर न्यूझीलंड संघाने सावध भूमिका घेताना पावरप्लेच्या समाप्ती नंतर न्यूझीलंड २ बाद ३८ धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसन ४२ चेंडूत ४६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार लगावला.
न्यूझीलंड संघाचा डाव सावरताना डॅरिल मिशेल सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३५ चेंडूत नाबाद ५३ धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. तसेच पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन शाह अफ्रिदीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आता पाकिस्तान संघाला विजयासाठी १५३ धावा करायच्या आहेत.
Pakistan vs New Zealand 1st Semi-Final Highlights : पाकिस्तान वि न्यूझीलंड लाइव्ह अपडेट्स
टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सिडनी येथे होणार आहे. नशिबाच्या जोरावर उपांत्य फेरीत पोहोचलेला पाकिस्तानचा संघ २००९ नंतर अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी उतरणार आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या नजरा सलग दुसऱ्या फायनलवर आहेत. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत भारत किंवा इंग्लंडविरुद्ध खेळेल.
न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हन कॉनवे (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, मार्टिन गुप्टिल, अॅडम मिल्ने, मायकेल ब्रेसवेल आणि मार्क चॅपमन.
पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद नवाज, मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, हैदर अली आणि आसिफ अली.
T20 World Cup 2022 Highlights, PAK vs NZ Semi-Final : पाकिस्तान वि न्यूझीलंड लाइव्ह अपडेट्स