सध्या भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीत आहे. या मालिकेतील 2 सामने झाले अडून त्यातील एक सामना भारताने लढत देऊन गमावला तर दुसऱ्या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. या कारणामुळे सध्या भारतीय चाहते काहीसे अस्वस्थ असून विराट सेना फॉर्ममध्ये येण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

या दरम्यान, भारतीय संघ आणि सर्व भारतीयांना प्रेरणा देणारा क्षण आज संघातील खेळाडूंनी अनुभवला. आज भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय संघाने ध्वजारोहण केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सर्व संघ सदस्यांनी ध्वजारोहण केले आणि तिरंगा फडकावत वंदन केले. लंडनच्या ताज हॉटेल जवळ टीम इंडियाने ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्यानंतर पुढील कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया नॉटिंगहॅमला निघाली.

 

 

 

भारतीय संघातील काही खेळाडूंनी आपल्या टि्वटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून या संदर्भातील फोटो शेअर केले आहेत. लंडनच्या ताज लंडन हॉटेल जवळ टीम इंडियाने ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा केला.