Premium

Brian Lara: “स्वार्थी म्हणणाऱ्यांना त्याचा…”, विराटबाबत अपशब्द वापरणाऱ्या पाकच्या हाफिजला ब्रायन लाराचे चोख प्रत्युतर

Brian Lara on Mohammad Hafeez: विराट कोहलीबाबत अपशब्द बोलणाऱ्या पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजला वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडू ब्रायन लाराने सडेतोड उत्तर दिले आहे.

Brian Lara furious at Pakistan's Hafeez for using slurs on Virat Those who call him selfish are jealous of him
विराट कोहलीबाबत अपशब्द बोलणाऱ्या पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजला वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडू ब्रायन लाराने सडेतोड उत्तर दिले. सौजन्य- (ट्वीटर)

Brian Lara on Mohammad Hafeez: नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या एकूण शतकांची संख्या ८० वर पोहोचली आहे. विराट सचिनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० शतकांचा विक्रम मोडेल, असा विश्वास चाहत्यांना आहे. मात्र, वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज आणि महान क्रिकेटपटू ब्रायन लाराची विचारसरणी वेगळी आहे. या गोष्टी तर्कहीन असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, त्याने विराट कोहलीबाबत अपशब्द बोलणाऱ्या पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजला वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडू ब्रायन लाराने सडेतोड उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताला पुढील वर्षी फक्त पाच एकदिवसीय सामने खेळायचे आहेत आणि त्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय भविष्याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. कोहलीला जर तेंडुलकरशी बरोबरी साधायची असेल किंवा त्याला मागे टाकायचे असेल तर त्याला कसोटी क्रिकेटवर बरेच अवलंबून राहावे लागेल. पुढील चार वर्षे पूर्ण तंदुरुस्तीने खेळत राहिल्यास तेंडुलकरशी बरोबरी साधण्यासाठी त्याला दरवर्षी पाच शतके झळकावी लागतील, जे सोपे नाही.

हेही वाचा: IND vs SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी द्रविडने सांगितला टीम इंडियाचा गेम प्लॅन; “आम्ही उसळत्या चेंडूच्या खेळपट्टीवर…”

स्वार्थीकोहली या हाफिजने केलेल्या वक्तव्याचा लाराने घेतला समाचार

कोहलीने नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय विश्वचषकात ११ सामन्यात ९५.६२च्या सरासरीने ७६५ धावा केल्या. विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत ७०० हून अधिक धावा करणारा तो पहिला क्रिकेटर ठरला आहे. त्याने तीन शतकेही झळकावली, परंतु अनेक शतके झळकावण्यासाठी त्याने आपला डाव संथ केला, त्यामुळे त्याच्यावर तो स्वार्थी खेळ करत असल्याची टीका झाली. त्यात पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद हाफिज हा आघाडीवर होता. विराट खरंच हे करत होता का? याबाबत लाराला विचारले असता, त्याने हाफिजच्या वक्तव्याला मूर्खपणा म्हटले आहे.

लारा म्हणाला, “जे हे बोलत आहेत ते विराटचा हेवा करत आहेत. त्याने इतक्या धावा केल्या आहेत त्यामुळे त्याचा हेवा सर्वांना वाटतो. मी माझ्या कारकिर्दीतही या अशा टीकांचा सामना केला आहे. स्वार्थी म्हणणाऱ्यांना त्याचा खूप हेवा वाटतो.” पाकिस्तानच्या मोहम्मद हाफीजने विराटवर संथ खेळण्याचा आरोप केला होता. हाफिजने विराटवर एका शोदरम्यान शतक झळकावताना स्वार्थी असल्याचा आरोप केला होता. आता ब्रायन लाराने त्याचे नाव न घेता त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा: Harsha Bhogle: “काहीतरी मोठा विचार…”, टीम इंडियाला ट्रोल करणाऱ्या पाकिस्तानी व्यक्तीला हर्षा भोगलेंनी दिले चोख प्रत्युत्तर

कोहलीच्या फलंदाजीचा चाहता असूनही अनुभवी ब्रायन लाराने मोठे विधान केले. तो एका मुलाखतीत म्हणाला, “कोहलीचे आता वय काय आहे? ३५ बरोबर? त्याच्या खात्यात ८० शतके आहेत, मात्र त्याला अजून २० शतकांची गरज आहे. जर त्याने दरवर्षी पाच शतके झळकावली तर त्याला तेंडुलकरशी बरोबरी साधण्यासाठी आणखी चार वर्षे लागतील. त्यावेळी कोहली ३९ वर्षांचा असेल. हे खूप अवघड काम आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Those who call virat selfish are jealous of him brian lara targets paks mohammad hafeez avw

First published on: 07-12-2023 at 16:54 IST
Next Story
Harsha Bhogle: “काहीतरी मोठा विचार…”, टीम इंडियाला ट्रोल करणाऱ्या पाकिस्तानी व्यक्तीला हर्षा भोगलेंनी दिले चोख प्रत्युत्तर