India vs South Africa, T20 Series: भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे, जिथे रविवार १० डिसेंबरपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. राहुल द्रविडने पुन्हा एकदा पदभार स्वीकारला असून, प्रशिक्षका पदाच्या करारातील मुदतवाढीनंतरची ही त्याची पहिली मालिका आहे. रोहितच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव या संघाचा कर्णधार आहे. या मालिकेबाबत द्रविडने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांचा दृष्टिकोन कसा असेल, यावर टीम इंडियाची योजना सांगितली आहे.

राहुल द्रविडचा असा विश्वास आहे की, दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे कठीण आहे. प्रत्येक भारतीय फलंदाजाने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी एक गेम प्लॅन असावा अशी त्याची इच्छा आहे. यावर त्याने सविस्तरपणे त्याचे मत मांडले आहे. टी-२० मालिकेसाठी निवड झालेला संघ हा नवखा असून त्यांना येथील खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय नाही.

Shashi Tharoor criticizes BCCI
IND vs SL : टीम इंडियाच्या निवडीवर शशी थरुर संतापले; म्हणाले, ‘ज्यांनी शतकं झळकावली त्यांनाच…’
Hardik Pandya pulled out of ODI series
IND vs SL : टीम इंडियाला मोठा धक्का! श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून हार्दिक पंड्या बाहेर? जाणून घ्या काय आहे कारण?
Sanath Jayasuriya, sri lanka head coach
श्रीलंकेच्या संघाला सावरणार ‘हा’ वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू, भारताविरूद्धच्या मालिकेपासून स्वीकारणार हेड कोचचा पदभार
Virat Kohli Meets Childhood Rajkumar Sharma Coach photo viral
Virat Kohli : टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडनंतर विराटने आपल्या ‘द्रोणाचार्यां’ची घेतली गळाभेट, फोटो होतोय व्हायरल
They have done a lot for Indian cricket Gautam Gambhir hails Rohit Sharma Virat Kohli after T20I retirement
“…टी-२० कारकीर्दीला पूर्णविराम देण्यापेक्षा आणखी चांगलं काय असू शकतं’; विराट-रोहितच्या निवृत्तीवर गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य
Jasprit Bumrah Gets Emotional As Baby Boy, Angad Witnesses Him Winning T20 WC, Hugs Wife, Sanjana
भारताच्या विजयानंतर बोलताना बुमराह झाला भावुक, ‘अँकर’ पत्नीशी संवाद साधून होताच मारली मिठी, पाहा VIDEO
IND vs SA Final
IND vs SA Final : हाती तिरंगा अन् ‘टीम इंडिया जिंदाबाद’च्या घोषणा; अंतिम सामन्यापूर्वी बार्बाडोसमध्ये प्रेक्षकांचा उत्साह; पाहा VIDEO
India Women Cricket Team Scored Highest Ever Team Total In Womens Test
INDW vs SAW: भारताच्या लेकींचा विश्वविक्रम, ९० वर्षांच्या महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ

हेही वाचा: AUS vs PAK: पाकविरुद्धच्या मालिकेनंतर स्मिथ वॉर्नरप्रमाणे कसोटीतून निवृत्त होणार का? ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापकाचे मोठे विधान

टी-२० मालिकेआधी राहुल द्रविड काय म्हणाला?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी राहुल द्रविड म्हणाला की, “आम्ही उसळत्या चेंडूच्या खेळपट्टीवर गोलंदाजांचा कसा सामना करावा, याचा सराव करत आहोत. फलंदाजी करण्यासाठी आफ्रिकेतील खेळपट्ट्या या आव्हानात्मक आहेत. याविषयीचे आकडे तुम्हाला माहित असतीलच. इथे फलंदाजी करणे खूप कठीण आहे. खासकरून सेंच्युरियन आणि जोहान्सबर्ग ही ठिकाणी चेंडू अधिक उसळी घेतो, त्यांच्या खेळपट्टीत सतत बदल होत राहतो. त्यामुळे प्रत्येक फलंदाजाकडे आपली एक योजना असेल की, त्यांना कशाप्रकारे पुढे जायचे आहे.”

स्टार स्पोर्ट्सवरील या दौऱ्याबद्दल बोलताना राहुल द्रविड म्हणाला, “आफ्रिका खंडात खेळण्यासाठी शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक कणखरता जास्त महत्त्वाची आहे.” तो पुढे म्हणाला, “आम्ही प्रत्येका खेळाडूकडून एकसारखे खेळण्याची अपेक्षा करत नाहीत. आमची इच्छा आहे की, त्यांनी येथील परिस्थितीचा अंदाज घ्यावा आणि मग आपल्यात बदल करावे. खेळाडू जेव्हा मैदानात पोहोचतात, तेव्हा हे अधिक मानसिक कणखर असणे आवश्यक आहे. मला वाटते की, तुम्हालाही माहितीये, आपण जे प्रयत्न करतो ते फक्त योग्य दिशेने जात आहेत की नाही, हे पाहणे आवश्यक आहे. वस्तुस्थितीवर भर देणे गरजेचे आहे. जर आपण चांगली खेळी करत पुढे गेलो तर त्यांनी सामना जिंकून देण्यात योगदान द्यावे.”

हेही वाचा: IND vs PAK: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी पुन्हा एकदा भिडणार भारत-पाकिस्तान; जाणून घ्या केव्हा, कुठे,कसा पाहाल सामना?

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला. अलीकडेच बीसीसीआयने त्याच्या कराराची मुदत वाढवण्याची अधिकृत घोषणा केली. मात्र, राहुल द्रविडचा हा कार्यकाळ किती काळ असेल, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक असेल, असे मानले जात आहे. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेत होणारी टी-२० मालिका अनेक युवा खेळाडूंसाठी महत्त्वाची ठरणार असून, त्यात प्रभावी खेळ दाखवून ते संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत सहभागी होऊ शकतात.