Babar Azam on Pakistan Team: भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाला व्हिसा मंजूर करण्यात आला आहे. लवकरच हा संघ पाकिस्तानातून भारतासाठी रवाना होणार आहे. याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने म्हटले आहे की, “मला माझ्याच खेळाडूंवर स्वतः पेक्षा अधिक विश्वास आहे आणि या संघामुळेच पाकिस्तान वन डेतील सर्वोत्तम संघांपैकी एक बनला आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाहोरमध्ये पत्रकार परिषदेत बाबर म्हणाले की, “एक संघ म्हणून आमचे मनोबल खूप वाढले आहे, आम्हाला विश्वास आहे की आम्ही आमचे सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू.” अलीकडेच पाकिस्तान संघाला भारताकडून लवकर व्हिसा न मिळाल्याने अडचणीचा सामना करावा लागला होता. मात्र, सर्व खेळाडूंना व्हिसा मिळाला असून लवकरच संघ भारतात पोहोचणार आहे.

हेही वाचा: Sri Lanka World Cup Squad: विश्वचषक २०२३साठी श्रीलंका संघ जाहीर! जखमी खेळाडूंना स्थान दिले, मेंडिसला बनवले उपकर्णधार

पाकिस्तानचा कर्णधार म्हणाला, “आम्ही आशिया चषकात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही, पण त्यातून आम्ही बरेच काही शिकलो आहे. आमच्या ज्या कोणी चुका दाखवतात त्यावर आम्ही खूप काम करतो आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो. आशिया कपपेक्षा इथे परिस्थिती वेगळी आहे. आम्ही चुका होणार नाहीत यावर लक्ष ठेवू आणि पाकिस्तानसाठी जे काही चांगले असेल ते करण्याचा प्रयत्न करू. आम्ही आमच्या सर्व योजना या विश्वचषकात अंमलात आणू.”

बाबर आझम म्हणाला, “माझा माझ्यापेक्षा माझ्या संघातील खेळाडूंवर जास्त विश्वास आहे. ही तीच मुले आहेत ज्यांनी सामने जिंकले आहेत, हे तेच खेळाडू आहेत ज्यांच्यामुळे पाकिस्तान संघ आयसीसी क्रमवारीत दोनदा नंबर वन झाला आहे. त्यांच्यामुळेच आम्ही मालिका जिंकतो. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.”

हेही वाचा: AB de Villiers: वर्ल्डकपनंतर विराट कोहली वन डे आणि टी२० मधून निवृत्ती घेणार? एबी डिव्हिलियर्सने केला मोठा दावा

आशिया चषक स्पर्धेत मधल्या षटकांमध्ये पाकिस्तानची गोलंदाजी अतिशय खराब झाली. ज्यावर बरीच टीकाही झाली होती. याबाबत बाबर म्हणाला, “मी शादाब खानशी बोललो आणि आम्ही एकमेकांना समजूनही घेतले आहे. मला आणि शादाबला माहित आहे की, आम्ही मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत नाही आहोत, पण माझा माझ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा माझ्या खेळाडूंवर जास्त विश्वास आहे.”

नसीम शाहच्या दुखापतीमुळे पाकिस्तानने हसन अलीचा वर्ल्ड कप संघात समावेश केला आहे. मात्र, हसन गेल्या एक वर्षापासून एकदिवसीय संघाचा भाग नाही. या बदलांबाबत बाबर म्हणाला, “मी खूप कमी बदल करतो, जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा चांगले परिणाम मिळतात. जेव्हा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा त्याला पाठिंबा द्यायला हवा.” विश्वचषकात पाकिस्तानचा पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी नेदरलँडशी होणार आहे. हा सामना हैदराबाद येथे होणार आहे. याआधी पाकिस्तानचा संघ सराव सामन्यांमध्येही सहभागी होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trust my players more than myself first pakistan captain babar azam to leave for india for the world cup avw