Vijay Hazare Trophy 2022 final match is being played today in Saurashtra vs Maharashtra | Loksatta

Vijay Hazare Trophy 2022 Final: ऋतुराजच्या बॅटची जादू दिसणार की जयदेव बॉलने चमत्कार करणार? पाहा प्लेइंग इलेव्हन

विजय हजारे ट्रॉफी २०२२ फायनल सामना आज सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र संघात खेळला जात आहे.

Vijay Hazare Trophy 2022 Saurashtra vs Maharashtra final match
विजय हजारे ट्रॉफी २०२२ स्पर्धेता फायनल सामना आज सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र (फोटो-बीसीसीआय ट्विटर)

विजय हजारे ट्रॉफी २०२२ स्पर्धेता फायनल सामना आज म्हणजेच शुक्रवारी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना सौराष्ट्र आणि महाराष्ट्र संघ विजेतेपदासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतील. या सामन्यात सौराष्ट्रचा वेगवान गोलंदाज आणि कर्णधार जयदेव उनाडकट आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आमनेसामने असतील. तेव्हा त्यांच्यात निकराची लढत होऊ शकते. कोणता खेळाडू कोणावर मात करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या स्पर्धेत दोन्ही खेळाडू चांगली कामगिरी केली आहे.

आजच्या फायनल सामन्यात सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या सामन्याला सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडचा महाराष्ट्र संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे.

ऋतुराज गायकवाड सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. संपूर्ण स्पर्धेत ऋतुराज गायकवाडने आपल्या कामगिरीच्या जोरावर लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्याने उपांत्यपूर्व फेरीत उत्तर प्रदेशविरुद्ध तर उपांत्य फेरीत आसामविरुद्ध शतक झळकावले. तरी तो महाराष्ट्रासाठी सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नाही. पण आल्यापासून त्यांनी संघाची धुरा सांभाळली. त्याने केवळ ४ सामन्यात ५५२ धावा केल्या आहेत.

सौराष्ट्रचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट हा आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो. उनाडकट या स्पर्धेत खूपच किफायतशीर ठरला आहे. त्याने ९ सामन्यात १८ विकेट घेतल्या आहेत. या काळात त्यांची इकॉनॉमी केवळ ३.५० इतकी राहिली आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण ८१.५ षटके टाकली असून एकूण २८१ धावा दिल्या आहेत. जयदेव उनाडकटने उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्नाटकविरुद्ध ४ बळी घेतले होते.

हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखले जातात. अशा परिस्थितीत कोण कोणावर मात करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महाराष्ट्र (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), सत्यजित बच्छाव, अंकित बावणे, अझीम काझी, राजवर्धन हंगरगेकर, सौरभ नवले (यष्टीरक्षक), मनोज इंगळे, मुकेश चौधरी, पवन शहा, नौशाद शेख आणि विकी ओस्तवाल.

हेही वाचा – अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर

सौराष्ट्र (प्लेइंग इलेव्हन): हार्विक देसाई (यष्टीरक्षक), शेल्डन जॅक्सन, जय गोहिल, समर्थ व्यास, प्रेरक मांकड, अर्पित वसावडा, चिराग जानी, धर्मेंद्रसिंह जडेजा, जयदेव उनाडकट (कर्णधार), कुशांग पटेल आणि पार्थ भुत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 09:34 IST
Next Story
“तर मी कपडे काढून.. ” ब्राझीलच्या प्रत्येक गोलवर टॉपलेस फोटो शेअर करणार ‘ही’ मॉडेल, फोटो पाहिलेत का?