Virat Kohli Daughter Fathers Day Letter for Father: १५ जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जात आहे. यादरम्यान अनेक क्रिकेटपटूंनी फादर्स डे निमित्त पोस्ट शेअर केल्या आहेत. टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या मुलीनेही तिच्या वडिलांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्का शर्माने हे पत्र तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना दोन मुलं आहे. १५ जूनला जगभरात फादर्स डे साजरा केला जात आहे. या खास दिवशी विराटची ४ वर्षांची मुलगी वामिकाने तिच्या वडिलांना खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. वामिकाने एक पत्र लिहिलं आहे. त्याच्यावर खाली तिची सहीदेखील आहे.
अनुष्का शर्माने फादर्स डे च्या पोस्टमध्ये या पत्राचा फोटो शेअर केला आहे. विराटच्या लेकीच्या या पत्राचा फोटो आता सगळीकडे व्हायरल झाला आहे. वामिकाने पत्रात तिच्या वडिलांचे खूप कौतुक केले आहे. पत्रात लिहिलंय की, “तो माझ्या भावासारखा दिसतो. तो खूप मजेशीर आहे. तो माझ्याबरोबर मस्ती करतो. मी त्याच्याबरोबर मेकअप खेळते. मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि तोही माझ्यावर खूप सारं प्रेम करतो. फादर्स डेच्या शुभेच्छा” या पत्राच्या शेवटी वामिकाने आपल्या चिमुकल्या हाताने तिचं नाव लिहित सही केली आहे.
अनुष्का शर्माने फादर्स डे च्या पोस्टमध्ये तिच्या वडिलांचा आणि पत्राचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अनुष्काने लिहिलंय, “पहिला व्यक्ती ज्याच्यावर मी प्रेम केलं आणि माझी लेक ज्या पहिल्या व्यक्तीवर प्रेम करते त्यांना फादर्स डे च्या शुभेच्छा.”.
विराट कोहलीसाठी आजचा फादर्स डे अजून एका गोष्टीमुळे खास ठरला. वामिकासह विराट त्याचा लेक अकायबरोबर पहिला फादर्स डे साजरा करणार आहे. विरूष्काने आपल्या दोन्ही मुलांना सोशल मीडियापासून लांब ठेवलं आहे.