Virat Kohli Social Media Earnings Disclosure: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील कमाईच्या बातम्या वेगाने पसरत होत्या. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की कोहली एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी सुमारे १४ कोटी रुपये घेतो. मात्र आता खुद्द विराट कोहलीने याचा खुलासा करताना हे खोटे असल्याचे सांगितले. याबाबत विराट कोहलीने स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे.

विराट कोहलीने शनिवारी एका ट्विटमध्ये आपल्या सोशल मीडिया कमाईच्या बातम्यांबद्दल सांगितले आहे. कोहलीने सांगितले की, त्याच्याबद्दल ज्या काही बातम्या इकडे-तिकडे पसरवल्या जात आहेत, त्या सर्व खोट्या आहेत. कोहलीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “आयुष्यात मला मिळालेल्या सर्व गोष्टींसाठी मी कृतज्ञ आणि ऋणी आहे, परंतु माझ्या सोशल मीडियावरील कमाईबद्दलच्या बातम्या खऱ्या नाहीत.”

म्हणजेच, आता हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की, विराट कोहली एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी १४ कोटी भारतीय रुपये घेत नाही. याचा खुलासा खुद्द कोहलीने केला आहे. विराट कोहली हा भारतातील इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलेला सेलिब्रिटी आहे. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीला २५६ दशलक्ष लोक फॉलो करतात. कोहली जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक आहे.

हेही वाचा – IND vs WI 4th T20 : शाहिद आफ्रिदीचा मोठा विक्रम मोडण्यास युजवेंद्र चहल सज्ज, वेस्ट इंडिजविरुद्ध करावा लागणार ‘हा’ पराक्रम

विराट कोहली अनेकदा इन्स्टाग्रामवर कोणत्या ना कोणत्या जाहिराती करताना दिसतो. जाहिरातीच्या माध्यमातून विराट कोहली चांगली कमाई करतो. पण तो एका पोस्टसाठी किती शुल्क घेतो हे स्पष्ट झालेले नाही. खुद्द कोहलीने मीडिया रिपोर्ट्सचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

आशिया चषक २०२३ पासून विराट कोहली करणार कमबॅक –

विराट कोहली सध्या कोणत्याही द्विपक्षीय मालिकेचा भाग नाही. अलीकडेच तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळताना दिसला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत कोहलीसह अनेक स्टार खेळाडू टीम इंडियाचा भाग नाहीत. अशा परिस्थितीत कोहली ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमधून पुनरागमन करेल. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.