इतर कोणत्याही देशात क्रिकेट खेळण्यापेक्षा मला भारतात खेळताना जास्त आनंद होतो. भारतीयांकडून जे प्रेम मिळालंय ते पाकिस्तानातही नाही मिळालं, असे पाकिस्तानी संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदी याने म्हटले आहे.
भारतामध्ये कधीच असुरक्षित वाटले नसल्याची भावना शाहिद आफ्रिदीने बोलून दाखविली. अफ्रिदी म्हणाला की, पाकिस्तानी खेळाडूंनी जेवढे प्रेम भारतात मिळते तितके पाकिस्तानमध्ये मिळत नाही. जगातील इतर कोणत्याही ठिकाणाप्रमाणेच भारतामध्येही खेळण्यास मला आवडते. आता मी माझ्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असून भारतात मिळालेले प्रेम मला कायमच स्मरणात राहिल.
सुरक्षाविषयक परवानगी मिळाल्यानंतर भारतात होणाऱ्या ट्वेंन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघ काल रात्री भारतात दाखल झाला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-03-2016 at 17:11 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We get more love in india than pakistan says shahid afridi