टी-२० विश्वचषक २०२४ अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. भारतीय संघ आपला दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध खेळणार आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी पत्रकाराने सुरेश रैनाला शाहीन आफ्रिदीच्या मुद्द्यावरू ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता, पण रैनाने त्या पत्रकाराला असे काही चोख उत्तर दिले की रैनाची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. पण आपल्या सांगण्यावरून रैनाने आपली एक्सवरील पोस्ट डिलीट केल्याचा खुलासा त्याने केला.

रैनाला चिडवताना एका पाकिस्तानी पत्रकाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले होते, ‘आयसीसीने शाहिद आफ्रिदीला टी-२० वर्ल्ड कप २०२४ चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. हॅलो सुरेश रैना?’

हेही वाचा – न्यूयॉर्कमध्ये ‘ढगाला लागली कळ…’ भर पावसात रोहित-द्रविडची पळापळ, VIDEO व्हायरल

यानंतर रैनानेही त्या पत्रकाराला प्रत्युत्तर देत म्हणाला, ‘मी आयसीसीचा ब्रँड ॲम्बेसेडर नाही. पण माझ्या देशात २०११ च्या विश्वचषकाची ट्रॉफी आहे, मोहालीचा सामना आठवतोय? आशा आहे की यामुळे तुमच्याकाही अविस्मरणीय आठवणी ताज्या झाल्या असतील.’

सुरेश रैनाचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. आता या ट्वीट बद्दल बोलताना आफ्रिदीने मोठा खुलासा केला. आता या ट्विटवर शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे की, मी या विषयावर रैनाशी बोललो होतो आणि त्यानंतर रैनाने त्याचे ट्विट डिलीट केले. आफ्रिदी टी-२० वर्ल्ड कपचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड झाल्याबद्दल आणि सुरेश रैनाने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर केलेल्या ट्विटवर आपले मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द

शाहिद आफ्रिदी म्हणाला, “मी, युवी (युवराज सिंग) आणि ख्रिस गेल यांची या टी-२० विश्वचषकासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. मला आनंद आहे की हे तेच लोक आहेत ज्यांच्यासोबत मी खूप क्रिकेट खेळलो आहे आणि आता भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान मी त्यांना पुन्हा भेटलो तर खूप आनंद होईल.”

रैनाच्या ट्विटवर हा माजी कर्णधार म्हणाला, “कधी कधी अशा गोष्टी घडत असतात. सोशल मीडियावर त्याची पोस्ट पाहिल्यानंतर, मी त्याच्याशी बोललो, आणि त्याला लहान भावाप्रमाणे त्याने ती परिस्थिती समजून घेतली. यावर सुरेश रैनाने ते ट्वीट डिलीट करतो म्हणत ते ट्वीट लगेच डिलीट केले. ठीक आहे; या गोष्टी घडतात.”