IND vs SL 1st ODI : KL Rahul asked Rohit Sharma for review : कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. यजमान श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी केली. यावेळी भारतीय संघ वर्चस्व गाजवत होता, तर श्रीलंकन ​​संघाचे फलंदाज धावांसाठी धडपडताना दिसत होते. पण या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये भारतीय खेळाडूं आयपीएलच्या नियमांचा उल्लेख करताना दिसत आहेत. कारण अंपायरने चेंडू वाईड दिला होता. पण चेंडू वाईड नसल्याचा भारतीय खेळाडूंना विश्वास होता. मात्र, यासाठी रिव्ह्यू घेण्यात आला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक, श्रीलंकेच्या डावाचे १४ वे षटक सुरू होते, तेव्हा शिवम दुबे गोलंदाजी करत होता. पहिल्याच चेंडूवर त्याला विकेट मिळाली. मात्र, चौथा चेंडू थोडासा लेग साइडला गेला आणि चेंडू मांडीच्या पॅडला लागला. केएल राहुलने हा झेल घेतला. आवाज नक्कीच आला होता, पण अंपायरने वाईड सिग्नल दिला. शिवम दुबेला वाटले की बॅट आणि बॉलचा संपर्क आहे, पण केएल राहुलला माहित होते की बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही, पण फलंदाजाच्या शरीर नक्कीच बॉलच्या संपर्कात आले आहे. यावर चर्चा करण्यासाठी लगेच सर्व भारतीय खेळाडू एकवटले.

केएल राहुल आणि रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल –

यावेळी यष्टिरक्षक आणि गोलंदाजाला कशाशी तरी संपर्क झाला आहे, असे वाटताच कर्णधार रोहित शर्माही जवळ आला. त्यावेळी केएल राहुलने कर्णधाराला विचारले की आयपीएलसारखा नियम आहे का? केएल राहुलला माहित होते की, जर चेंडू कुठेतरी फलंदाजाच्या संपर्कात आला असेल, तर तो किमान वाईडसाठी रिव्ह्यू घेऊ शकतो. मात्र, केवळ आयपीएलमध्ये वाईडसाठी रिव्ह्यू घेण्याचा नियम आहे. हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू होत नाही. त्याने रिव्ह्यू घेतला असता तरी बॉल वाईड झाला असता आणि रिव्ह्यू गमावला असता, कारण रिव्ह्यू तेव्हाच वाचवता येतो जेव्हा चेंडू आणि बॅटचा संपर्क असतो, पण इथे तसे काही झाले नव्हते.

हेही वाचा – IND vs SL 1st ODI : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी दंडाला का बांधली काळी पट्टी? जाणून घ्या कारण

भारताला विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य –

सामन्याबद्दल बोलायचे तर श्रीलंकेने भारताला विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी २-२ विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेसाठी पाथुम निसांका आणि दुनिथ वेललागे यांनी चमकदार कामगिरी करत अर्धशतके झळकावली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने ५० षटकांत ८ गडी गमावून २३० धावा केल्या. यावेळी वेल्लाघेने ६५ चेंडूत नाबाद ६७ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. पाथुमने ५६ धावांची खेळी केली. वानिंदू हसरंगाने २४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताकडून अक्षर पटेलने २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wide review like ipl kl rahul asked rohit sharma if the drs could be used for wides as well during ind vs sl 1st odi vbm
Show comments