IND vs ENG, World Cup 2023: आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी गतविजेता इंग्लंड क्रिकेट संघ भारतात दाखल झाला आहे. मात्र विमान प्रवासादरम्यान संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खरंतर, टीमला भारताचा प्रवास करण्यासाठी ३८ तासांपेक्षा जास्त वेळ लागला, त्यानंतर अनेक खेळाडू या प्रवासावर नाराज झाले आहेत. त्यात इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने पावसामुळे सराव सामना रद्द झाल्याने त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत आपली व्यथा मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने त्याचा प्रवासाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. २०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा प्रवास ३८ तासांपेक्षा जास्त लागल्याबद्दल बेअरस्टोने नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर स्टोरी शेअर करताना त्याने लिहिले, ‘संपूर्ण गोंधळ. अंतिम टप्पा येत आहे. ३८ तास आणि अजूनही तासांची मोजणी सुरू आहे.” एवढ्या लांबचा प्रवास आणि त्यात पावसामुळे सराव सामना रद्द झाला, त्यामुळे जॉनी बेअरस्टो खूप निराश झाल्याचे यावरून स्पष्ट होते. बेअरस्टोच्या या स्टोरीत ख्रिस वोक्स आणि कर्णधार जोस बटलर यांच्या शेजारी सर्वसामान्य लोक दिसतात.

पावसामुळे पहिला सराव सामना रद्द

भारत आणि इंग्लंडच्या संघांना विश्वचषकापूर्वी सरावाची संधी मिळाली नाही. दोघांमधील पहिला सराव सामना गुवाहाटी येथे होणार होता, मात्र पावसामुळे तो होऊ शकला नाही. गुवाहाटी येथील स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक पोहोचले होते, मात्र त्यांना निराश होऊन परतावे लागले. या मैदानावर २९ सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सराव सामना पूर्ण झाला. त्यात बांगलादेशने सात गडी राखून विजय मिळवला होता.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतर हवामान खराब झाल्याने खेळ सुरू होऊ शकला नाही. सततच्या पावसामुळे पंचांनी बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द झाल्याचे घोषित केले. टीम इंडिया आता ३ ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्ध दुसरा सराव सामना खेळणार आहे. हा सामना तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा संघ गुवाहाटीमधील याच मैदानावर त्यांचा दुसरा सराव सामना बांगलादेशविरुद्ध २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी खेळणार आहे.

हेही वाचा: Cricket Fight: क्रिकेट सामन्याचे WWE मध्ये रूपांतर, बॅट अन् स्टंपने तुफान हाणामारी, सहा खेळाडू गंभीर जखमी; पाहा Video

विश्वचषक २०२३ साठी इंग्लंड संघ-

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup england team reached guwahati after traveling for 38 hours in economy class bairstow expressed pain avw