Premium

IND vs AUS: “तुम्ही फोनही केला नाही…”, ‘कमिटमेंट’च्या प्रश्नावर अमित मिश्रा रोहित शर्माला असं का म्हणाला? सराव दरम्यानचा Video व्हायरल

India vs Australia 3rd ODI: राजकोटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे आधी पहिल्या सराव सत्रानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि अमित मिश्रा यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

IND vs AUS: You didn't even call why did Amit Mishra say this to Rohit Sharma on commitment question Video during practice goes viral
पहिल्या सराव सत्रानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि अमित मिश्रा यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सौजन्य- (ट्वीटर)

India vs Australia 3rd ODI: राजकोटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पहिल्या सराव सत्रानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने अमित मिश्राची चेष्टा-मस्करी केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. बुधवारी (२७ सप्टेंबर) सकाळी तो संघात सामील झाला आणि संध्याकाळी सराव सत्रात सहभागी झाला. विश्वचषकापूर्वीच्या अंतिम लढतीपूर्वी कर्णधाराला फॉर्म गवसला आहे आणि आज मोठी धावसंख्या तो उभारू शकतो अशी चाहत्यांना आशा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमित मिश्राला पाहताच रोहित म्हणाला, “तुझे डोळे लाल का आहेत? (आपकी आंखें इतनी लाल क्यों हैं?).” रोहित शर्मा मिश्राला पुढे बोलताना म्हटला की, “माझ्या कॅप्टन्सीखाली तुझ्यासारखे फिरकीपटू कधीही खेळले नाही.” ज्यावर मिश्राने गंमतीशीर उत्तर दिले, “तुम्ही कधीही फोन केला नाही!” त्यादरम्यान रविचंद्रन अश्विन हा माईक धरून उभा होता आणि त्याच्या मजेशीर संभाषणामुळे एकच हशा पिकला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

अमित मिश्रा २०२३च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळला. गेल्या मोसमात त्याने फ्रँचायझीसाठी सात सामन्यांत तितक्याच विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, फिरकीपटू २०१७ पासून आंतरराष्ट्रीय निवडीसाठीच्या वादापासून दूर आहे, जेव्हा त्याने इंग्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे शेवटचे प्रतिनिधित्व केले होते. २०१९ मध्ये हरियाणासाठी त्याचा शेवटचा लिस्ट ए क्रिकेटचा सामना होता.

भारताने याआधीच ही मालिका २-०ने जिंकली आहे आणि त्यामुळे शेवटच्या सामन्यात रोहित शर्मावर कोणतेही अतिरिक्त दडपण नसेल. कर्णधार शेवटचा आशिया कप २०२३ मध्ये खेळला होता आणि तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने तीन महत्त्वपूर्ण अर्धशतके झळकावली आणि तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता.

सामन्यात काय झाले?

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कमिन्सने प्लेइंग-११मध्ये पाच बदल केले आहेत. मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले आहे. तर, तनवीर संगा वन डेमध्ये पदार्पण करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही प्लेइंग-११ मध्ये बरेच बदल केले आहेत. रोहित स्वतः, कुलदीप आणि विराट संघात पुनरागमन करत आहेत. त्याचवेळी शुबमन, शार्दुल, अश्विन आणि इशान खेळत नाहीत. अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदर ऑफस्पिनरची भूमिका निभावणार आहे.

हेही वाचा: IND vs AUS 3rd ODI: ऑस्ट्रेलियाचा सुपडा साफ करण्यासाठी टीम इंडिया सज्ज! पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

सात षटकांनंतर ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता ६३ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर २७ चेंडूत ४३ धावांवर तर मिचेल मार्श १५ चेंडूत २२ धावांवर खेळत आहे. दोघेही चौकार-षटकारांची आतिषबाजी करत आहेत. आजची खेळपट्टी ही फलंदाजीला खूपच जास्त पोषक आहे त्यामुळे या ठिकाणी भारतीय संघाला विकेट्स घेण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: You didnt even call why did amit mishra say this to rohit sharma on the question of commitment learn avw

First published on: 27-09-2023 at 14:33 IST
Next Story
Asian Games: युवराज सिंगचा ‘तो’ विक्रम मोडणारा कोण आहे नेपाळी क्रिकेटपटू दीपेंद्र सिंग ऐरी? जाणून घ्या