आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि व्यस्त जीवनशैलीमुळे, केवळ भारतातच नाही तर जगभरात मधुमेही रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचे टाईप १ आणि टाईप २ असे दोन प्रकार आहेत. या आजारावर वेळीच योग्य उपचार केले नाही तर इतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची लक्षणं ओळखणे गरजेचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाइप २ मधुमेहाची सुरुवात हळूहळू होऊ शकते आणि सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे सौम्य असू शकतात. परिणामी, अनेकांना हा आजार झाल्याचे लक्षात येत नाही. आज आपण या आजाराच्या प्रारंभिक लक्षणांबाबत माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे तुम्ही वेळीच रक्तातील उच्च साखरेचा धोका टाळू शकता.

मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे

  • हाताला किंवा पायाला मुंग्या येणे, ते सुन्न होणे किंवा दुखणे

रक्तातील साखरेची उच्च पातळी रक्ताभिसरण प्रभावित करू शकते आणि शरीराच्या मज्जातंतूंना नुकसान पोहोचवू शकते. यामुळे टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांमध्ये, हात आणि पाय दुखणे किंवा मुंग्या येणे, सुन्न होणे अशा समस्या जाणवू शकतात.

  • त्वचेवर काळे डाग

मान, काख किंवा कंबरेवर काळे ठिपके देखील उच्च मधुमेहाचा धोका दर्शवू शकतात. हे पॅचेस खूप मऊ आणि मखमली वाटू शकतात. त्वचेची ही स्थिती अ‍ॅकॅन्थोसिस निग्रिकन्स म्हणून ओळखली जाते.

Health Tips : तुम्हीही दररोज रात्री अंघोळ करता का? मग याचे दुष्परिणाम पाहाच

  • खाज आणि यीस्ट संक्रमण

रक्त किंवा लघवीमधील जास्त साखरेमुळे संसर्ग होऊ शकतो. यीस्टचा संसर्ग त्वचेच्या उबदार, ओलसर भागांवर होतो, जसे की तोंड, जननेंद्रियाचे भाग, इत्यादी.

  • सतत तहान लागणे

रक्तातील अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी वारंवार लघवी करणे आवश्यक असते, परंतु यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. कालांतराने यामुळे निर्जलीकरण होऊन व्यक्तीला नेहमीपेक्षा जास्त तहान लागते.

  • सतत भूक लागणे

मधुमेह असलेल्या लोकांना अनेकदा त्यांच्या अन्नातून पुरेशी ऊर्जा मिळत नाही. पाचक प्रणाली अन्नाचे ग्लुकोजमध्ये खंडन करते. याचा वापर शरीर इंधन म्हणून करते. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये, हे ग्लुकोज पुरेशा प्रमाणात रक्तप्रवाहातून शरीराच्या पेशींमध्ये जात नाही. परिणामी, टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांना अनेकदा भूक लागते.

  • थकवा जाणवणे

टाईप २ मधुमेह व्यक्तीच्या उर्जेच्या पातळीवर परिणाम करू शकतो आणि त्यामुळे त्यांना खूप थकवा जाणवू शकतो. हा थकवा शरीराच्या पेशींमध्ये रक्तप्रवाहातून साखरेच्या अपर्याप्ततेमुळे होतो.

Photos : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी Rainbow Diet आहे अतिशय फायदेशीर; जाणून घ्या याचे शरीराला होणारे फायदे

  • वारंवार लघवी होणे

जेव्हा रक्तातील साखरेची पातळी जास्त असते, तेव्हा मूत्रपिंड रक्तातील अतिरिक्त साखर फिल्टर करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे व्यक्तीला जास्त वेळा लघवी करण्याची गरज भासू शकते. विशेषतः रात्री मोठ्याप्रमाणावर लघवी होते.

  • अंधुक दृष्टी

रक्तातील अतिरिक्त साखरेमुळे डोळ्यातील लहान रक्तवाहिन्या खराब होतात, ज्यामुळे दृष्टी अंधुक होऊ शकते. ही अस्पष्ट दृष्टी एक किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये येऊ शकते. जर मधुमेहाने ग्रस्त व्यक्ती उपचाराशिवाय राहिली तर या रक्तवाहिन्यांचे अधिक गंभीर नुकसान होऊ शकते.

  • जखमा हळू बऱ्या होणे

उच्च साखरेची पातळी शरीराच्या नसा आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते, ज्यामुळे रक्त परिसंचरण बिघडू शकते. परिणामी, लहान जखमा देखील बरे होण्यासाठी आठवडे किंवा महिने लागू शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before diabetes the body gives this nine signals if you are also experiencing symptoms be alert in time pvp