वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण उद्या म्हणजेच शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी कार्तिक शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होईल. हे आंशिक चंद्रग्रहण आहे आणि संपूर्ण भारताऐवजी अंशतः केवळ देशाच्या पूर्व भागात दिसणार आहे. यामुळेच देशात सुतक कालावधी वैध राहणार नाही. पण या चंद्रग्रहणाला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. चंद्रग्रहण सर्व राशींवर परिणाम करेल. काही राशींवर याचा शुभ प्रभाव पडेल, तर काही राशींना ग्रहणकाळात सावध राहण्याची गरज आहे असं जोतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ

वर्ष २०२१ चे शेवटचे चंद्रग्रहण वृषभ राशीमध्ये होणार असून या काळात वृषभ राशीच्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. कारण ग्रहणाच्या प्रभावामुळे तो मानसिक तणावाचा बळी होऊ शकतो.

( हे ही वाचा: Chandra Grahan 2021: ५८० वर्षांनंतर दिसणार मोठं आंशिक चंद्रग्रहण, जाणून घ्या भारतात कुठे दिसणार )

कन्या

चंद्रग्रहणाचा प्रभाव कन्या राशीवरही दिसून येतो. लक्षात ठेवा चंद्रग्रहण काळात पैशाशी संबंधित कोणतेही व्यवहार करू नका.

तूळ

यावेळी तूळ राशीच्या आठव्या घरात चंद्रग्रहण होणार आहे. या काळात तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

( हे ही वाचा: Kartik Purnima 2021: कार्तिक पौर्णिमा २०२१ कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि उत्सवाशी संबंधित पौराणिक कथा )

वृश्चिक

चंद्रग्रहणाच्या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्हाला वादापासून दूर राहावे लागेल. जर तुम्ही व्यापारी असाल तर व्यवहारात सावधगिरी बाळगा.

धनु

धनु राशीच्या सहाव्या भावात म्हणजेच शत्रूंच्या घरात चंद्रग्रहण होत आहे.

( हे ही वाचा: Guru Nanak Jayanti 2021: ‘या’ दिवशी साजरी होणार गुरु नानक जयंती, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व )

मकर

तुम्ही विद्यार्थी असाल तर चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे तुमचे मन अभ्यासात कदाचित लागणार नाही. मकर राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या दिवशी थोडी काळजी घेण्याची गरज आहे.

मीन

मीन राशीच्या तिसऱ्या घरात चंद्रग्रहण होईल आणि त्याचा प्रभाव तुमचा आत्मविश्वास कमी करू शकतो. यासोबतच तुम्हाला कौटुंबिक जीवनात तणावाचाही सामना करावा लागेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandra grahan 2021 the last lunar eclipse of the year tomorrow may affect these zodiac signs ttg
First published on: 18-11-2021 at 18:22 IST