Chandra Grahan 2021: ५८० वर्षांनंतर दिसणार मोठं आंशिक चंद्रग्रहण, जाणून घ्या भारतात कुठे दिसणार

तज्ज्ञांच्या मते, ५८० वर्षांनंतर असे घडेल जेव्हा एवढ्या मोठं आंशिक चंद्रग्रहण दिसेल. १४४० मध्ये इतके मोठं चंद्रग्रहण झाले होते.

Chandra Grahan 2021
चंद्रग्रहण २०२१ (फोटो: जनसत्ता)

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल जे भारताच्या उत्तर-पूर्व राज्यांमध्ये दिसेल. तज्ज्ञांच्या मते, ५८० वर्षांनंतर असे घडेल जेव्हा एवढ्या मोठं आंशिक चंद्रग्रहण दिसेल. याआधी १८ फेब्रुवारी १४४० रोजी इतके मोठे चंद्रग्रहण झाले होते. जाणून घ्या तुम्हाला हे ग्रहण कुठे, कसे आणि कधी पाहता येईल.

हे चंद्रग्रहण कुठे दिसणार?

हे ग्रहण भारताच्या ईशान्य भागात दिसणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागात हे दिसून येईल. याशिवाय उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रदेशात हे दिसून येईल.

( हे ही वाचा: December Horoscope: डिसेंबरमध्ये ‘या’ पाच राशींना होणार धनलाभ; होणार प्रगती! )

चंद्रग्रहणाची तारीख आणि वेळ

चंद्रग्रहण शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३४ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ५.३३ वाजता संपेल. खंडग्रास ग्रहणाचा एकूण कालावधी ०३ तास २६ मिनिटांचा असेल. पेनम्ब्रल (उपच्छाया) चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ०५ तास ५९ मिनिटे असेल.

( हे ही वाचा: वास्तुशास्त्रानुसार मातीच्या ‘या’ तीन गोष्टी ठेवा घरात; चमकू शकते नशीब )

छाया ग्रहण म्हणजे काय?

ग्रहण सुरू होण्यापूर्वी चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो, त्यानंतर तो पृथ्वीच्या वास्तविक सावलीत प्रवेश करतो. जेव्हा हे घडते, तेव्हा खरे चंद्रग्रहण होते. परंतु पेनम्ब्रल चंद्रग्रहण दरम्यान, चंद्र पृथ्वीच्या वास्तविक सावलीत प्रवेश न करता बाहेर येतो. ज्योतिषशास्त्रात पेनम्ब्रल चंद्रग्रहणाला ग्रहणाचा दर्जा दिला जात नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandra grahan 2021 large partial lunar eclipse after 580 years find out where in india ttg

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ
ताज्या बातम्या