Guru Nanak Jayanti 2021: ‘या’ दिवशी साजरी होणार गुरु नानक जयंती, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

गुरु नानक जयंतीला प्रकाश पर्व, गुरु पर्व, गुरु परब असेही म्हणतात. जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व.

Guru Nanak Jayanti 2021
गुरु नानक जयंती २०२१ (फोटो: जनसत्ता )

गुरु नानक जयंती हा शीखांचा सर्वात मोठा सण मानला जातो. शीख धर्मात, गुरु नानक जयंती कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी शीख धर्माचे अनुयायी भजन कीर्तन करतात आणि वाहेगुरुचा जप करतात. यंदा गुरुनानक जयंती १९ नोव्हेंबरला आहे.

गुरु नानक जयंती ‘या’ नावांनीही ओळखली जाते

गुरु नानक जयंतीला प्रकाश पर्व, गुरु पर्व, गुरु परब असेही म्हणतात. गुरु नानक जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी, प्रकाश पर्वाला साजरी केली जाते. गुरु नानक देवजींनी शीख धर्माची स्थापना केली. प्रकाशपर्व दिवशी पहाटेपासून गुरुद्वारांमध्ये धार्मिक विधी सुरू होतात आणि रात्री उशिरापर्यंत चालतात. या दिवशी लोक गुरुवाणीचे पठणही करतात. प्रकाश पर्वाच्या दिवशी संध्याकाळी लंगरचेही आयोजन केले जाते. ज्यामध्ये अनुयायी भोजन घेतात.

( हे ही वाचा: Chandra Grahan 2021: ५८० वर्षांनंतर दिसणार मोठं आंशिक चंद्रग्रहण, जाणून घ्या भारतात कुठे दिसणार )

गुरु नानक जयंतीचा इतिहास

गुरु नानक देव हे शीख धर्माचे पहिले गुरु होते. गुरु नानक देवजी यांचा जन्म इ.स. १४६९ रोजी झाला. नानकजींचा जन्म १४६९ मध्ये कार्तिक पौर्णिमेला पंजाब (पाकिस्तान) प्रदेशातील रावी नदीच्या काठी वसलेल्या तलवंडी नावाच्या गावात झाला. मात्र, आता गुरु नानकजींचे हे जन्मस्थान आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नानकाना साहिबमध्ये आहे.

( हे ही वाचा: December Horoscope: डिसेंबरमध्ये ‘या’ पाच राशींना होणार धनलाभ; होणार प्रगती! )

आता या ठिकाणाचे नाव नानक देव म्हणून ओळखले जाते. येथे देश-विदेशातील लोक प्रसिद्ध गुरुद्वारा ननकाना साहिबला भेट देण्यासाठी येतात. असे म्हणतात की हा गुरुद्वारा ‘ननकाना साहिब’ शीख साम्राज्याचे राजा महाराजा रणजित सिंग यांनी बांधला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Guru nanak jayanti 2021 when is gurpurab date significance history and all you need to know ttg

Next Story
अकाली जन्मणा-या बाळांच्या फुप्फुसांच्या रक्षणासाठी हळद उपयोगी
ताज्या बातम्या