आपल्यापैकी अनेकजण लहान सहान गोष्टी विसरुन जातात. विसरभोळेपणा हा प्रत्येकामध्ये थोड्याफार प्रमाणात असतो. शिवाय विसरण्याच्या सवयीमुळे आपणाला कामाच्या ठिकाणी, घरात किंवा बाहेर फिरायला गेल्यावरती अनेक अडणीचा सामाना करावा लागतो. यामध्ये वस्तू विसरणे, एखादे काम विसरणे किंवा एखादी महत्त्वाची गोष्ट कोणाला सांगायला विसरणे असे अनेक प्रकार आपल्याबाबत घडत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवसातून एखादं काम विसरणे ही काही मोठी गोष्ट नाही, ते कोणाच्याही बाबतीत होऊ शकते. परंतु तुमच्याकडून वारंवार अनेक गोष्टी विसरत असतील ,तर मात्र तुम्ही एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. फोन विसरणे, एखाद्याने सांगितलं काम विसरणे यांसारख्या काही गोष्टी सतत विसरण्याची सवय तुम्हाला लागली असेल तर याचा अर्थ तुमची स्मरणशक्ती कमकुवत झाली असण्याची शक्यता आहे. जर तुमची स्मरणशक्ती कमकुवत झाली असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. कारण, आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची स्मरणशक्ती मजबूत करू शकणार आहात.

हेही वाचा- आता रोज अंघोळ करण्याची गरज नाही? होय, विज्ञान काय सांगतंय ते एकदा जाणून घ्याच

ब्रेन फूड्स खा –

ज्याप्रमाणे आपल्या शरीराला पोषणाची गरज असते, त्याचप्रमाणे मेंदूलाही निरोगी राहण्यासाठी आणि योग्यरित्या कार्यरत राहण्यासाठी पोषणाची आवश्यकता असते. असे काही नैसर्गिक पदार्थ आहेत जे मेंदूसाठी आवश्यक असतात, त्या पदार्थांचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करायला हवा. ज्यामध्ये, पाण्यात भिजवलेले बदाम, मनुका, तूप, ऑलिव्ह ऑईल, अक्रोड, खजूर यासह ताज्या फळांचा वापर आहारात केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच मसूर, बीन्स, पनीर आणि मसूर या पदार्थांतही मेंदूसाठी चांगले असतात.

औषधी वनस्पती –

हेही वाचा- तुम्हीही हेअर सीरम वापरता का? हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी त्याचा वापर कसा करावा जाणून घ्या

आयुर्वेदिक औषधी वनस्पती मानवी मेंदूच्या धी, धृती आणि स्मृती या तीन्ही शिकण्याच्या क्षमतांमध्ये सुधारणा करत असतात. गोटू कोला, अश्वगंधा आणि बाकोपा यांसारख्या यातील काही विशेष औषधी गुणतत्व स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करतात.

भाज्या आणि फळांचे प्रमाण वाढवा –

हेही वाचा- ‘या’ ५ तेलांचा वापर केल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील

एका सर्वेक्षणानुसार, आपला आहार आणि आपली स्मरणशक्ती यांचा एकमेकांशी संबंध असतो. त्यामुळे जास्त प्रमाणात भाज्या आणि फळांचा समावेश आहारात केल्यास विसरभोळेपणा कमी होण्यास मदत होते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constantly forgetting something make sure to do remedies to boost brain health jap