Five Healthiest Cooking Oils: कोलेस्ट्रॉलची समस्या आता सामान्य होत चालली आहे. खराब आहार आणि बिघडलेली जीवनशैली याचे मुख्य कारण आहे. कोलेस्टेरॉल हा एक चरबीसारखा पदार्थ आहे जो यकृताद्वारे बाहेर पडतो. अंडी, मांस, मासे, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनानेही कोलेस्टेरॉल शरीरात पोहोचते.

शरीरातील पेशी निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल आवश्यक आहे. तसच निरोगी राहण्यासाठी, कोलेस्ट्रॉलची पातळी राखली पाहिजे. जेव्हा शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा होते, त्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो. ही स्थिती हृदयाशी संबंधित आजारांना जन्म देते आणि कधीकधी यामुळे हृदयविकाराचा झटकाही येतो.

अन्नामध्ये वापरले जाणारे तेल देखील खराब कोलेस्टेरॉलसाठी एक घटक मानले जाते. खाद्यतेलांमध्ये असणारे सॅच्युरेटेड फॅट्समुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. उदाहरणार्थ, खोबरेल तेल, पाम तेलामध्ये आढळणारे सॅच्युरेटेड फॅट्स खराब कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढवू शकतात. अशा परिस्थितीत ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, त्यांनी आरोग्यदायी तेलाचा पर्याय शोधला पाहिजे. अशा पाच तेलांविषयी जाणून घेऊया, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत…

शेंगदाणा तेल

शेंगदाणा तेल हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जेवणामध्ये शेंगदाणा तेलाचा वापर केल्याने चांगले कोलेस्ट्रॉल कमी न होता वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. शेंगदाणा तेल ग्रीलिंगसाठी, भाज्या तळण्यासाठी आणि मांस तळण्यासाठी योग्य आहे.

तिळाचे तेल

तिळाचे तेल कोलेस्ट्रॉल मुक्त असते. त्यात संतुलित प्रमाणात चांगली चरबी असते. याच्या प्रत्येक एका चमच्यामध्ये ५ ग्रॅमपेक्षा जास्त मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, २ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट असते. तिळाचे तेल भाज्या बनवण्यासाठी करता येऊ शकतो.

(हे ही वाचा: रात्री ‘या’ गोष्टी खाल्ल्यास युरिक ॲसिड झपाट्याने वाढू शकते; संधिवात होण्यापूर्वी ‘या’ गोष्टींपासून दूरच राहा)

ऑलिव्ह तेल

ऑलिव्ह ऑइलमध्ये कोलेस्टेरॉल नसते. हे पौष्टिक असून त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. ऑलिव्ह ऑइलचा वापर सॅलड्स किंवा पास्तासाठी टॉपिंग म्हणूनही केला जातो.

चिया बियांचे तेल

चिया सीड ऑइलमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. ते तळण्यासाठी, पास्ता आणि सॅलडसाठी चांगले आहे. चिया बियांमध्येही भरपूर फायबर असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एवोकॅडो तेल

एवोकॅडो तेल हे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे तेल मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचा चांगला स्रोत आहे. कोलेस्ट्रॉलमध्ये या तेलाचे सेवन करणे चांगले आहे.