सिताफळ या फळांचा शरद ऋतूच्या सुरुवातीला हंगाम सुरू होतो. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. या फळांमुळे कोणकोणते फायदे आपल्या शरीराला होतात? या सर्वांची माहिती आणि याचे शरीराला होणारे फायदे जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिताफळ खाण्याचे फायदे

सिताफळामध्ये आयन, प्रोटीन, विटामिन्स ए, विटामिन्स सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कोपर असे अनेक प्रकारचे महत्वाचे घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्व मिळतात. आजारपणामुळे जर थकवा आला असेल तर, सिताफळाचे फळ नक्की खावे. तुम्हाला त्यामुळे आपल्या शरीरात शक्ती निर्माण होते.

सिताफळा मध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. अनेक लोकांना हृदयाच्या समस्या असतात. ठोके जास्त प्रमाणात होणे, दडपण येणे यांसारखे अनेक प्रकारचे समस्या होत असतात. या समस्या सिताफळ खाल्ल्यामुळे कमी होतात. त्याच बरोबर अनेक लोकांना पित्ताचा त्रास ही खूप प्रमाणात होत असतो. सीताफळाचे सेवन केल्यामुळे पित्त ही कमी होते.

पोटामध्ये जळजळ होत असेल तर, अशा वेळीही सीताफळ खाणं खूप उपयोगी ठरले जाते. असे म्हटले जाते की, कोणत्याही फळ खाताना साली सोबत खावे. परंतु सीताफळाची साल खाल्ल्यामुळे ते आपल्या आरोग्यास हानिकारक असते. म्हणून सीताफळ खाताना त्याची साल कधीही खाऊ नये.

सिताफळा मध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम असते त्यामुळे हाडे बळकट होतात. ती मजबूत होतात. त्याचबरोबर सिताफळा मध्ये फायबर हे भरपूर प्रमाणात असते. पोट साफ होण्याची समस्या अनेक जणांना असते हे सीताफळाचे सेवन केल्यामुळे ही समस्याही दूर होते. त्याचबरोबर सीताफळाचे सेवन केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी ही चांगल्या प्रकारची राहते.

कोणत्याही प्रकारचे डोळ्यांचे आजार होत नाहीत. स्तनाचा कर्करोग करणाऱ्या ज्या पेशी असतात त्या पेशींची वाढ थांबवण्याची ते काम हे सीताफळ करते. ज्या लोकांना सर्दी खोकला झाला असेल किंवा ज्या लोकांना कफ त्रास असेल त्या लोकांनी सिताफळाचे सेवन करू नये. कारण सीताफळ हे थंड प्रवृत्तीच्या असते. यामुळे कफ वाढण्याची शक्यता असते.

त्याचबरोबर ज्या व्यक्तींचे काम एका ठिकाणी बसून आहे अशा व्यक्तींनी ही त्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. कारण यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सीताफळाच्या बिया आणि साल कधीही खाऊ नये. त्यामुळे एलर्जी होण्याची शक्यता असते व आपल्या शरीराला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे अशा व्यक्तीने ही सिताफळाचे सेवन करणे टाळावे. त्यामध्ये गोड गुणधर्म जास्त प्रमाणात असल्यामुळे शुगर वाढण्याची शक्यता असते.

अशाप्रकारे आपल्या शरीराला सिताफळाचे अनेक फायदे होतात. अनेक आजारही यामुळे नष्ट होतात. त्याचबरोबर काही आजार आजारांवर हे गुणकारी नसते. त्यामुळे याचे सेवन अशा व्यक्तीने करू नये.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Custard apple is rich in antioxidants so know the benefits to your body scsm