भारतात मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे. अगदी लहान वयातही अनेकांना मधुमेह होत आहे. यात शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. एखाद्या व्यक्तीस मधुमेह झाला तर मरेपर्यंत तो बरा होत नाही, पण त्यावर नियंत्रण ठेवता येते. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रण न राहिल्यास आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. यामुळे रुग्णांना वारंवार भूक आणि तहान लागते तर अनेकांना वारंवार लघवीला जावे लागते. यात आता उन्हाळा सुरु झाला असून अनेक मधुमेहाचे रुग्ण डिहायड्रेशनचे बळी ठरत आहेत. उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांना तीव्र घाम येणे, थकवा जाणवतो. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. पण ही काळजी कशापद्धतीने घेतली पाहिजे जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी या १० पद्धतीने घ्या काळजी

१) शरीर हायड्रेटेड ठेवा.

मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. यासह शरीरास फायदेशीर पेय प्यायले पाहिजे. परंतु या पेयामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

२) नियमित व्यायाम करा.

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणं गरजेच आहेच पण शारीरिक हालचाली होणे देखील आवश्यक आहे. यामुळे नियमित व्यायाम करा. सकाळी किंवा सायंकाळी किमान २० मिनिटे चाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुपारी कडक उन्हात घराबाहेर पडू नका.

३) कॅफिन सेवन कमी करा.

उन्हाळ्यात कॉफी किंवा इतर कोणतेही एनर्जी ड्रिंकसारख्या कॅफिनचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.

४) शरीरातील बदलांवर लक्ष ठेवा

रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनची वेळेवर तपासणी करणे गरजेचे आहे. जर तुमच्या शरीरात काही बदल जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच ऋतूनुसार कोणत्या औषधांचा डोस बदलण्याची गरज असेल तर डॉक्टरांकडून बदलून घ्या. कारण अनेकदा काही गोळ्या किंवा औषधांमुळे पोटात उष्णता वाढते.

५) कपड्यांवर विशेष लक्ष द्या.

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी हलक्या रंगाचे आणि सैल कपडे घालणे गरजेचे आहे. कारण फिट कपड्यांमुळे तुम्हाला उन्हाळ्यात गुदमरल्यासारखे वाटू शकते. यामुळे पांढरा, निळा अशा रंगाचे सुती कापडाचे कपडे घाला.

६) सनस्क्रीन वापरा

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जशी पाण्याची गरज आहे तशी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी सनस्क्रीनची गरज आहे. कारण सनबर्नमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, यामुळे चक्कर, थकवा या समस्या उद्भवू शकतात. यामुळे सनस्क्रीनचा वापर करत तुम्ही तीव्र उष्णापासून स्वत:चं रक्षण करू शकता.

७) जास्त साखर असलेले ज्यूस पिऊ नका.

उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी थंड ताज्या ज्यूसची गरज असते. परंतु जास्त साखर असलेल्या ज्यूसमुळे शरारीतील साखरेचे प्रमाण पुन्हा वाढू शकते. त्यामुळे कमी साखर असलेल्या फळांचा ज्यूस प्या. याशिवाय घरीच्या घरी ज्यूस बनवून पिऊ शकता.

८) फायबरयुक्त आहार खा.

फायबरयुक्त आहार पचनासाठी उत्तम असते. यामुळे तुमचे पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे तुम्ही कमी अन्न खाता. तसेच रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रणात राहते.

९) वेळेवर औषधोपचार करा.

मधुमेहाच्या रुग्णांनी वेळेवर औषधोपचार करणे खूप महत्वाचे आहे. कारण मधुमेहासोबत त्यांना इतर कोणता आजार असले आण त्याकडे लक्ष दिले नाही तर तो वाढण्याची शक्यता असते. तसेच मधुमेहावरील औषधं वेळेवर न घेतल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि त्यामुळेही इतर आजार बळावण्याची शक्यता वाढते. कारण हवामानानुसार शरीरातही अनेक बदल होत असतात. या बदलांना जळवून घेण्यासाठी शरीरा चांगली रोगप्रतिकार शक्ती गरजेची असते. या औषधोपचारांमुळे रुग्णाला रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवता येते.

१०) घराबाहेर पडण्याची वेळ निश्चित करा.

घराबाहेर पडण्यासाठी एक वेळ निश्चित करा. सूर्य डोक्यावर असताना आणि तापमान वाढत असताना शक्यतो घराबाहेर जाणे टाळा. तसेच यावेळेत घराबाहेर पडणारचं असाल तर छत्री किंवा स्कार्फ वापरा. महत्वाचे म्हणजे हात, पाय, चेहऱ्याला सनस्क्रीन लावूनचं बाहेर पडा, सोबत नेहमी एक पाण्याची भरलेली बाटली कॅरी करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes tips for summer 10 ways to regulate your blood sugar levels in humid weather sjr