diwali 2025 date: तिमिरातून तेजाकडे नेणारे सण म्हणजे दिवाळी. हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. हा सण आनंद आणि समृद्धी आणणारा मानला जातो. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि सुख-समृद्धीची देवता श्री गणेशाची पूजा केली जाते. या उत्सवाचा एक वेगळाच उत्साह संपूर्ण देशभरात पाहायला मिळतो. तसेच हा वर्षातील सर्वात मोठा सणही मानला जातो. यावर्षी दिवाळी कधी साजरी केली जाईल आणि धनत्रयोदशीपासून भाऊबीज कधी आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दिवाळी पहिला दिवस कधी? जाणून घ्या धनत्रयोदशी, नरक चतुर्थी ते भाऊबीजची योग्य तारीख

यंदाची दिवशी १८ ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत साजरी होणार आहे. त्यानुसार, १८ ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. या दिवशी खरेदी आणि लक्ष्मी-कुबेर पूजेला महत्व आहे. त्यानंतर, नरक चतुर्दशीचा दिवस असतो. या दिवसाला पहिली अंघोळ देखील म्हणतात. या दिवसाचं महत्त्व म्हणजे, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला. आणि त्यानंतर तेलाने स्नान करून आपला विजय साजरा केला. याच परंपरेनुसार, नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.

दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आणि यावर्षी तो २० ऑक्टोबर २०२५ रोजी आहे. पण लोकांमध्ये अजूनही गोंधळ आहे की दिवाळी 20 ऑक्टोबरला आहे की २१ ऑक्टोबरला.

दिवाळी कार्तिक अमावस्येला साजरी केली जाते. यावर्षी अमावस्या २० ऑक्टोबरला सुरू होऊन २१ ऑक्टोबरपर्यंत आहे. सूर्यास्तानंतर लक्ष्मीपूजन होत असल्याने दिवाळी २० ऑक्टोबर म्हणजेच , सोमवारी साजरी केली जाईल.

२२ ऑक्टोबर २०२५ ला बालिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. नवविवाहित वधु-वरांसाठी हा दिवस फार खास असतो.

दिवाळीतील ‘हे’ महत्त्वाचे ५ दिवस

१८ ऑक्टोबर २०२५ – धनत्रयोदशी

२० ऑक्टोबर २०२५ – नरक चतुर्दशी

२१ ऑक्टोबर २०२५ – लक्ष्मीपूजन

२२ ऑक्टोबर २०२५ – बलिप्रतिपदा/ दिवाळी पाडवा

२३ ऑक्टोबर २०२५ – भाऊबीज