Best Time to Eat Fruit: शरीर पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी, तज्ञ नियमित व्यायामासह नियंत्रित आणि निरोगी खाण्याची शिफारस करतात. केवळ अन्नातून शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत, त्यामुळे फळांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, फळं खाण्यासाठी कोणती वेळ सर्वोत्तम आहे याबद्दल बरेच तर्क लावले गेले आहेत. रात्रीच्या वेळी फळे खाऊ नयेत असे अनेकांचे म्हणणे आहे. प्रसिद्ध पोषणतज्ञ मोहिता याविषयी सविस्तर सांगतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फळं का महत्त्वाची आहेत?

‘रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरला दूर ठेवता येते’ ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल, म्हणजे रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज पडत नाही अर्थात तुम्ही निरोगी राहता. वास्तविक, फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जसे की पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन सी इ. जे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

(हे ही वाचा: Diabetes : मेथी दाणे साखर नियंत्रित ठेवण्यासाठी करतात मदत, जाणून घ्या फायदे)

फळं खाण्याची योग्य वेळ कोणती?

फळं खाण्याबाबत अनेक संकल्पना आहेत, कोणते फळं कोणत्या वेळी खावे. रात्रीच्या वेळी फळं खाऊ नयेत असे म्हणणारे अनेक लोक तुम्हाला आढळतील. मात्र रात्रीच्या वेळीही फळं खाण्यात काहीही नुकसान होत नाही, असे मोहिता सांगतात. म्हणूनच रात्रीच्या वेळीही फळं खाण्यास संकोच करू नये.

(हे ही वाचा: Diabetes: बडीशेप मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे वरदान! ‘अशा’ प्रकारे करा वापर)

(हे ही वाचा: वजन कमी करण्यापासून ते मधुमेह नियंत्रणापर्यंत, जाणून घ्या ‘या’ फुलाच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे)

कोणत्या वेळी फळं खाऊ नयेत?

मोहिता सांगतात की, फळे खाणे कोणत्याही वेळी आरोग्यासाठी फायदेशीर असले, तरी झोपण्याच्या किमान ३ तास ​​आधी काहीही खाऊ नये जेणेकरून तुम्हाला चांगली झोप लागेल. आहारतज्ञ म्हणतात की फळं आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वे पुरवतात. यामुळे आपण रोज आपल्या शरीरानुसार फळांचे सेवन केले पाहिजे. मोसमी फळांचाही आस्वाद घ्यावा, कारण उन्हाळ्यात आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून डॉक्टर नेहमी अशी फळे खाण्याचा सल्ला देतात ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you eat fruit at night learn from experts the right time ttg
First published on: 24-06-2022 at 12:36 IST