Best Yoga Asanas : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. नियमित व्यायाम व पौष्टिक आहार घेत नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात. अशात एकाच जागी बसून ८-९ तास काम असल्याने शरीराचे पोश्चर बिघडत आहे पण टेन्शन घेऊ नका. फक्त पाच मिनिटांचे हे योगा रुटीन फॉलो करा. यामुळे सततची पाठदुखी व शरीराचे खराब पोश्चर नीट होण्यास मदत होईल. याविषयी योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी पाच मिनिटे काही योगासने करण्यास सांगितले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फक्त ५ मिनिटे ही योगासने करा

व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे – ९-५ बसून काम, सततची पाठदुखी, शरीराचे खराब पोश्चर असेल तर तुमच्यासाठी ५ मिनिटांचे योगा रुटीन आहे. अर्धमत्स्येंद्रासन ३० सेकंद दोन्ही बाजूने करावे. मार्जरीआसन ५ ते ७ वेळा करावे. व्याघ्रासन दोन्ही पायाने ५ वेळा करावे. शशांकासन ३० सेंकद करावे. भुजंगासन ३० सेकंद करावे.
या व्हिडीओमध्ये योग अभ्यासक मृणालिनी हे सर्व योगा करून दाखवतात. हे सर्व योगासने समजून घेण्यासाठी तुम्हाला खालील व्हिडीओ नीट पाहावा लागेल.

हेही वाचा : Banana Leaves: अन्न शिजवताना, वाढताना केळीच्या पानांचा का केला जातो वापर? ‘हे’ तीन आजार दूर करण्यास होईल मदत; वाचा डॉक्टरांचे मत

पाहा व्हिडीओ

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्हालासुद्धा सतत ८-९ तास एकाच जागी बसून काम करावे लागत असेल व खूप वेळ एकाच अवस्थेत बसण्यामुळे त्याचा वाईट परिणाम पाठीच्या कण्यावर होऊन पाठदुखी/कंबरदुखी आणि शरीराचे पोश्चर बिघडत चालले असेल तर हे ५ मिनिटांचे योगा रूटीन तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. नियमित सरावाने तुमची पाठदुखी कंबरदुखी कमी होईल. मणक्याचे आरोग्य सुधारेल.शरीराचं पोश्चर व्यवस्थित रहाण्यास मदत होईल . शरीराला आराम मिळेल.याचा सराव तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ करू शकता.”

हेही वाचा : Swiggy : भारीच! कॅटरर्स, हलवाई नव्हे, जोडप्यानं ऑनलाइन केलं जेवण ऑर्डर; साखरपुड्यात पाहुण्यांसाठी खास सोय; पाहा मजेशीर पोस्ट

योग अभ्यासक मृणालिनी या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवनवीन योगासनांविषयी माहिती देत असतात.हजारो लोक त्यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. त्यांचे प्रत्येक व्हिडीओ युजर्सना आवडतात आणि युजर्स त्यांच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you have bad body posture due to 8 to 9 hours sitting job follow 5 minutes yoga routine ndj
Show comments