सेक्स ही जोडप्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. सेक्स ही शरीराची एक गरज आहे आणि जोडप्यांच्या सुखी नात्यामधील एक दुवा आहे. सेक्स ही दोन व्यक्तींमधील इंटीमसी असते आणि यात आपल्या जोडीदाराला सुख मिळावं अशी स्त्री-पुरुष दोघांचीही इच्छा असते. सेक्स हा आरोग्याच्या आणि मातृत्वाच्या (Pregnancy) दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पण अनेकदा सेक्स करत असताना काही लोकांना डोकेदुखी जाणवते. हे लोक डॉक्टरांशी याबद्दल बोलण्यास संकोच करतात आणि डॉक्टरांनी याबद्दल विचारलं असताना मोकळेपणाने उत्तर देत नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन संशोधनानुसार, शारीरिक संबंध ठेवताना अनेकांचं डोकं दुखतं. त्याला सेक्स हेडेक म्हणतात. फारच कमी लोक याची तक्रार करतात परंतु सेक्स करताना तीव्र डोकेदुखीचा अनुभव घेणाऱ्या लोकांची वास्तविक संख्या खूप जास्त असू शकते, असं संशोधनातून समोर आलं आहे.

लोयोला युनिव्हर्सिटी शिकागो स्ट्रिच स्कूल ऑफ मेडिसिन मधील जोस बिलर म्हणाले, अनेकदा सेक्स करत असताना काही लोकांना डोकेदुखी जाणवते. हे लोक डॉक्टरांशी याबद्दल बोलण्यास संकोच करतात आणि डॉक्टरांनी याबद्दल विचारलं असताना मोकळेपणाने उत्तर देत नाहीत. सेक्स संबंधित डोकेदुखी सौम्य ते गंभीर स्वरूपाची असू शकते. हे अत्यंत वेदनादायक आणि भितीदायक देखील असू शकते, असं बिलर यांनी सांगितलं आहे. या गोष्टी हलक्यात घेऊ नका, असंही ते म्हणाले आहेत.

(हे ही वाचा : प्रसूतीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवणे योग्य? डॉक्टर सांगतात… )

सेक्स हेडेकवेळी होणारी डोकेदुखी तीन प्रकारची

१. एक वेदना जी डोके आणि मानेमध्ये उत्तेजनापूर्वी सुरू होते आणि उत्तेजना वाढते म्हणून तीव्र होते.

२. दुसऱ्या प्रकारची डोकेदुखी अतिशय तीव्र असते जी संभोग दरम्यान सुरू होते आणि कित्येक तास टिकते.

३. शरीरसंबंधाच्या आधी किंवा नंतर अचानक होणारी तीव्र डोकेदुखी.

अशा प्रकारची डोकेदुखी अचानक उद्भवते आणि डोक्याच्या मागच्या बाजूला एक भयानक वेदना होते. त्याच वेळी, सेक्सनंतर तिसऱ्या प्रकारची डोकेदुखी जाणवते. हे सौम्य ते अत्यंत वेदनादायक देखील असू शकते. या प्रकारची डोकेदुखी उभ्याने जास्त जाणवते आणि पाठीवर झोपल्याने आराम मिळतो, असे ते सांगतात.

महिलांपेक्षा पुरुषांना सेक्स हेडेक अधिक होतो?

दरम्यान, स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना सेक्स संबंधित डोकेदुखीची शक्यता तीन ते चार पट जास्त असते, असेही संशोधनातून दिसून आले आहे. त्याच्या आधारावर औषधे घेतली जाऊ शकतात, असंही बिलर यांनी सांगितलं आहे.

याशिवाय डॉक्टर दररोज व्यायाम करण्याची आणि निरोगी वजन राखण्याचा देखील सल्ला देतात. त्याचबरोबर दारू आणि सिगारेट कमी केल्यास याचा सकारात्मक परिणाम देखील दिसून येतो. साधारणपणे कुठलीही डोकेदुखी चिंताजनक नसते. पण शरीर संबंध ठेवताना डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांची भेट नक्की घेतली पाहिजे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you often suffer a headache while making love or after the act men suffer more headaches during sex than women pdb