Fruits That Prevent Cancer: कर्करोग (कॅन्सर) हा केवळ एक आजार नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक आणि आर्थिक स्थैर्याला हादरवून टाकणारे मोठे संकट आहे. कर्करोग म्हणजेच कॅन्सर हा शब्द ऐकला की, त्यापाठोपाठ एक प्रकारची भीती, हळहळ व काळजी समोर येते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सगळ्यात घातक आणि जीवघेणा आजार म्हणजे कर्करोग. ही एक असा गंभीर आजार आहे की, जो कोणालाही, कोणत्याही वयात होऊ शकतो. कर्करोग होण्याच्या कारणांमध्ये आनुवंशिकता, शारीरिक अस्वच्छता व रासायनिक पदार्थांचा वापर यांशिवाय जीवनशैली आणि आहार नियमनाशी संबंधित काही बाबीदेखील कारणीभूत आहेत.

कॅन्सर हा शब्द उच्चारताच माणसाच्या मनात एक अस्वस्थता निर्माण होते आणि ती केवळ रुग्णापुरती मर्यादित राहत नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाला आपल्या विळख्यात घेते. या आजाराच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च होतात. या विकाराचा शरीरासह मनावरही अपार ताण येतो आणि बराच काळ आयुष्य थांबल्यासारखं वाटतं. म्हणूनच आज गरज आहे ती कर्करोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक पावलं उचलण्याची. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) स्पष्ट केलं आहे की, कर्करोग हे जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचे मृत्यूचं प्रमुख कारण आहे. विशेष म्हणजे भारतातही या रोगाचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. मात्र, एक दिलासादायक गोष्ट म्हणजे काही विशिष्ट फळांचा नियमित आहारात समावेश केल्यास कर्करोगाचा धोका टाळता येतो.

डाएटिशियन दिव्या गांधी यांनी सांगितलं, “दैनिक आहारात काही विशिष्ट फळांचा समावेश केल्यास शरीराला ऊर्जा मिळते, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि विशेषतः कर्करोगाचा धोका कमी होतो.” चला, पाहूया कोणती आहेत ती फळं, जी आरोग्यरक्षणात मोलाची भूमिका बजावतात.

१. सफरचंद

सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.  सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक आढळतात. सफरचंदात पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम व लोह समृद्ध प्रमाणात असतात. सफरचंद हे अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरने परिपूर्ण असे फळ आहे. त्यामधील घटक शरीरातील हानिकारक पेशींचा नाश करतात आणि विशेषतः कोलन कॅन्सर (आतड्याचा कर्करोग) पासून संरक्षण करतात. नियमित सेवनामुळे पचन सुधारतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते.

२. काळी द्राक्षे

काळ्या द्राक्षांमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतात. काळ्या द्राक्षांमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. काळ्या द्राक्षांमध्ये रेसव्हेराट्रॉल (Resveratrol) नावाचा घटक असतो. काळ्या द्राक्षांमध्ये रेसव्हेराट्रॉल (Resveratrol) आणि फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids) ही प्राकृतिक रसायने असतात, जी कॅन्सरविरोधी असतात. तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात आणि शरीरातील घातक कणांचा नाश करतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

३. पपई

पपई (Papaya) हे अतिशय उपयुक्त फळ आहे. पपई खाल्ल्याने शरीरात वाढत असलेल्या अनेक प्राणघातक कॅन्सरच्या पेशीसुद्धा नष्ट होऊ शकतात. पपईमध्ये लायकोपिन आणि कॅरोटीनॉइड्स हे घटक भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील कॅन्सरकारक घटकांची वाढ रोखतात. महिलांसाठी हे फळ अत्यंत लाभदायक असून, मासिक पाळीमधील वेदना कमी करण्यातही ते मदत करते.

आजच तुमच्या आहारात या फळांचा समावेश करा. कारण- आरोग्याची ही लढाई चव आणि आरोग्य यांचा एकत्र मेळ साधत जिंकता येते.