Papaya for weight loss: फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पपई हेसुद्धा असे एक फळ आहे, जे कोणत्याही ऋतूमध्ये उपलब्ध असते. या फळात मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. पपईत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, दृष्टी सुधारतात आणि रंग उजळवतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासानुसार. पपईच्या गरात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, पॅन्टोथेनिक अ‍ॅसिड आणि फोलेट सारखी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे तसंच मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी खनिजे आणि भरपूर फायबरही असते.

पपई हे एक साधे मात्र आश्चर्यकारक फायदे देणारे फळ आहे. आयुर्वेदिक चिकित्सकांपासून ते आहारतज्ज्ञांपर्यंत सर्वजण त्याच्या गुणधर्मांबाबत सांगतात. पपईमध्ये आढळणारे पपेन हे एन्झाइम पचनास मदत करते आणि पोटफुगी रोखते. पपईमध्ये जीवनसत्त्वे, बायोएक्टिव्ह संयुगे आणि लिपिड रचना असते, जी जळजळ कमी करते. यातले थ्रोम्बोजेनेसिस आणि ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण करते आणि उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.

दररोज नाश्त्याला एक वाटी पपई खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. अनेकदा एखादा पदार्थ किंवा फळ दररोज खायचं असं म्हटल्यावर लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण होतात. तेव्हा पपई दररोज खाल्ल्याने आरोग्यावर नेमके काय परिणाम होतील हे जाणून घेऊ…

वजन झपाट्याने कमी होते

दररोज सकाळी एक वाटी पपई खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते आणि दिवसभर अन्नाची इच्छा कमी होते. हे कमी कॅलरी आणि फायबरयुक्त फळ तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते. पपई खाणे वजन कमी करण्यास मदत करते आणि ते नियमितपणे खाल्ल्याने वजन कमी करणे सोपे होते.

ह्रदयासाठी देखील फायदेशीर

पपईमध्ये पोटॅशियम, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, जे ह्रदयाच्या आरोग्याला चालना देतात. ही पोषकतत्वे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास, रक्त प्रवाह सुधारण्यास आणि ह्रदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करतात. कमी साखर आणि हाय फायबर घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. पपईतील पपेन एन्झाइम जळजळ कमी करते आणि ह्रदयासाठी आवश्यक दाहक विरोधी गुणधर्म प्रदान करते.

यकृताचे आरोग्य राखते

एका अभ्यासानुसार, पपईमध्ये हायपोलिपिडेमिक, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. ते यकृताचे संरक्षण करतात आणि त्याचे कार्य सुधारतात. यामध्ये अशी संयुगे असतात, जी जळजळ कमी करतात आणि यकृताला विषमुक्त करण्यास मदत करतात. ते पचन आणि आतड्यांचे आरोग्यदेखील सुधारते.

बद्धकोष्ठतेपासून आराम

फायबरने समृद्ध असलेली पपई खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनसंस्था सुधारते. त्यातील एन्झाइम अन्न सहज पचवण्यास मदत करतात आणि पोट विषमुक्त करतात. यामुळे आतड्यांची नियमित हालचाल होते आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.

कर्करोगास प्रतिबंधात्मक गुणधर्म

अभ्यासांमधून असे दिसून आले की, पपईच्या बियांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत आणि ते यकृत आणि प्रोस्टेट कॅन्सरसह विविध प्रकारच्या कॅन्सरसाठी फायदेशीर ठरू शकतात. लायकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट्स कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखतात आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. पपईमध्ये कॅरोटीनदेखील असते. हे महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेदना नियंत्रित करण्यास मदत करू शकते.