5 foods to improve hemoglobin: रक्ताची कमतरता असल्यास अॅनिमिया हा आजार उद्भवू शकतो. जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन किंला लाल रक्तपेशींचे प्रमाण साधारण प्रमाणापेक्षा कमी होते, तेव्हा ही परिस्थिती उद्भवते. हिमोग्लोबिन संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करते. याच्या कमतरतेमुळे शरीराच्या पेशी आणि अवयवांपर्यत पुरेसा ऑक्सिजन पोहोचू शकत नाही. अॅनिमिया अनेक कारणांमुळे होऊ शकतो. यामागचं सर्वात सामान्य कारण म्हणजे लोहाची कमतरता. कारण हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोह आवश्यक असते. व्हिटॅमिन बी १२ किंवा फोलेटची कमतरता, जास्त रक्तस्त्राव, गर्भधारणा, संसर्ग किंवा काही जुनाट आजारांमुळे देखील अशक्तपणा होऊ शकतो.
अशक्तपणाची लक्षणे अचानक दिसून येत नाहीत, ती हळूहळू दिसतात. अशक्तपणाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे थकवा, जो तुम्हाला काही छोटंसं काम केलं तरी लगेचच थकवा जाणवतो. डोकेदुखी, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, धडधडणे, फिकट त्वचा, थंडी वाजणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडथळा येणे हेदेखील होऊ शकते. नखे ठिसूळ होऊ शकतात किंवा ओठ आणि डोळे पिवळे होऊ शकतात. महिलांना मासिक पाळीत रक्तस्त्राव होणे आणि पुरूषांना शस्त्रक्रियेदरम्यान अधिक रक्तस्त्राव होणे या मुळेही अशक्तपणा येऊ शकतो. वेळेवर योग्य आहार घेतल्यास अशक्तपणावर नियंत्रण करता येऊ शकते.
रिसर्च लॅबचे डॉ. भूषण यांनी दि इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला अशक्तपणाचा त्रास होत असेल तर हिवाळ्यात हा उपाय नक्की करून पहा. मनुका, खजूर, काळे तीळ, गूळ आणि अळशी यांचे पावडर बनवा आणि त्याचे सेवन करा. हिवाळ्यात सकाळी आणि रात्री या पावडरे सेवन केल्याने तुमचे शरीर निरोगी राहील आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत होईल. यासाठी महत्त्वाचे पाच पदार्थ आहेत जे अशक्तपणा कमी करण्यास मदत करतात आणि त्यांचे सेवन किती आणि कसे करावे याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
कशी तयार करायची पावडर?
हिवाळ्यात अशक्तपणा दूर करण्यासाठी ५० ग्रॅम मनुका, ५० ग्रॅम खजूर, ५० ग्रॅम वाळलेले आवळे, अर्धा चमचा काळे तीळ, गूळ आणि २५ ग्रॅम जवस एकत्र करा. ते वाळवल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि पावडर हवाबंद डब्यात ठेवा. सकाळी एक चमचा आणि रात्री एक चमचा दुधासोबत ह पावडर घ्या. महिनाभर नियमितपणे हे सेवन केल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते, अशक्तपणा आणि थकवा दूर होतो आणि शरीर उत्साही राहते.
या पावडरमधील घटक अशक्तपणा बरा करण्यास कसे मदत करतात?
मनुका – मनुक्यात भरपूर प्रमाणात लोह असते. ते हिमोग्लोबिन उत्पादनासाठी आवश्यक असते. लोह लोल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते आणि त्यांची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढवते. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम देखील लोहाचे शोषण वाढवते. दररोज त्यांचे सेवन केल्याने रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
खारिक किंवा खजूर– खजूर हे लोहाचे नैसर्गिक स्त्रोत आहे. ते हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते. त्यात व्हिटॅमिन बी ६, मॅग्नेशियम आणि फोलेटदेखील असते. ते हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. खजूरचे नियमित सेवन केल्याने ऊर्जा वाढते आणि थकवा कमी होतो.
सुका आवळा– आवळा हा व्हिटॅमिन सी चा एक उत्त स्त्रोत आहे. व्हिटॅमिन सी लोहाचे शोषण वाढवते, त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. ते अँटी-ऑक्सिडंट म्हणून देखील काम करते आणि रक्त शुद्ध करते.
काळे तीळ– काळ्या तीळांमध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. ते हिमोग्लोबिनचे उत्पादन वाढवतात. ते हाडे आणि स्नायू मजबूत करतात. तीळामधील मॅग्नेशियम आणि जस्त रक्त निर्मितीसाठी देखील उपयुक्त आहेत.
गूळ– गूळ हा लोहाचा नैसर्गिक स्त्रोत आहे. तो शरीरात लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढवतो आण हिमोग्लोबिनची पातळी वाढवतो. गूळ खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते. अशक्तपणा आणि थकवा दर करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.
अळशीच्या बिया– जवाच्या बियांमध्ये लोह, फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात. या बिया रक्त शुद्ध करतात आणि रक्ताभिसरण सुधारतात. जवसाच्या बियांचे नियमित सेवन केल्याने हिमोग्लोबिन उत्पादनात मदत होते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
हे मिश्रण का उपयुक्त आहे?
मनुका, खजूर, काळे तीळ, गूळ आणि अळशी यांचे मिश्रण शरीरातील रक्तनिर्मिती वाढवते. हे लोहयुक्त पदार्थ हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन सी शरीरात लोहाचे शोषण वाढवते, रक्त आणि शरीराची ऊर्जा राखण्यास मदत करते. नियमित सेवनाने हिमोग्लोबिनची पातळी वाढते, थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. तसंच शरीर उत्साही आणि सक्रिय राहते.