Ayurvedic remedies for Thyroid: सध्या थायरॉईड ही एक गंभीर आरोग्य समस्या ठरत आहे. अनेक जम थायरॉईडच्या समस्येने ग्रस्त आहेत. आधुनिक भाषेत त्याला हार्मोनल असंतुलन मानलं जातं, तर आयुर्वेद त्याला शरीरातील खोल असंतुलनाचे लक्षण मानते. आयुर्वेदात थायरॉईड विकारांना अग्नि दोष, धातू विकृती आणि त्रिदोष असंतुलन याचे एकत्रीकरण म्हणून पाहिले जाते. यामध्ये वात, पित्त आणि कफ दोष महत्त्वाची भूमिका बजावतात. हा दृष्टिकोन शरीराला एक समग्र अस्तित्व मानून उपचारांवर भर देतो. यामध्ये थायरॉईड केवळ एक ग्रंथी नाही, तर चयापचय आणि ऊर्जा संतुलनाचे केंद्र आहे.

थायरॉईडची लक्षणे

आयुर्वेदानुसार, थायरॉईड ग्रंथी विशुद्ध चक्राशी संबंधित आहे. ती पचन अग्नी आणि धत्वाग्नी नियंत्रित करते. हायपोथायरॉईडिझममध्ये वात आणि कफचे प्रमाण जास्त असते. यामुळे थकवा, वजन वाढणे आणि आळस यासारखी लक्षणे दिसतात. हायपोथायरॉईडिझममध्ये पित्ताचे प्रमाण जास्त असल्याने चिडचिड, वजन कमी होणे आणि ह्रदयाचे जलद ठोके अशी लक्षणं दिसून येतात.

तुमच्या लाइफस्टाइलमध्ये काही बदल आवश्यक

आयुर्वेद थायरॉईडवरील उपायांसाठी लाइफस्टाइलमध्ये बदल करण्यावर भर देते. पुरेशी झोप, नियमित व्यायाम, ताण व्यवस्थापन आणि आयोडिन, झिंक असा समृद्ध आहार घेणे आवश्यक आहे.

आयुर्वेदानुसार, अश्वगंधा, गुग्गुलु, शिलाजित आणि त्रिफळा सारख्या औषधी वनस्पती थायरॉईड संतुलित करण्यास मदत करतात. पंचकर्म सारख्या शुद्धीकरण प्रक्रिया शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि दोष संतुलित करतात. सकाळी १० ते १५ मिनिटे उबदार सूर्यप्रकाश देखील घ्याला. सूर्यनमस्कार, सर्वांगासन, मत्स्यासन आणि नौकासन करू शकता आणि प्राणायामांपैकी अनुलोम-विलोम आणि उज्जयीदेखील करू शकता. असे केल्याने पचनशक्ती सुधारते.

निरोगी आहार महत्त्वाचा

आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात की, नियमित दिनचर्या, सात्विक आहार आणि मेडिटेशन याद्वारे थायरॉईड नैसर्गिकरित्या नियंत्रित केला जाऊ शकतो. आधुनिक आणि आयुर्वेदिक पद्धतींचे उपचार एकत्र केल्याने केवळ लक्षणे कमी होतातच असे नाही, तर एकूण आरोग्यदेखील सुधारते.