Easy remedies to clean bowels: बिघडलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटाशी संबंधित समस्या वाढत्या प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे. यामुळे अपचनापासून ते बद्धकोष्ठतेपर्यंतच्या समस्या उद्भवतात. सकाळी उठल्यावरच लोकांना बाथरूमला जावे लागते, मात्र त्यांचे पोट काही पूर्णपणे साफ होत नाही. परिणामी पोट बिघडणे, गॅस, पोटदुखी आणि आळस यासारख्या समस्या उद्भवतात. हे त्रास साधे वाटत असले तरी यामुळे मोठे आजार उद्भवू शकतात.

हार्वर्डमध्ये प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टोरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी दी इंडियन एक्सप्रेसशी यासंदर्भात बोलताना सांगितले की, तुमच्या आतड्यांचे आरोग्य राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेव्हा आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत. आतड्यांचे आरोग्य बिघडल्याने अपचन तसंच रोगप्रतिकारक शक्तीबाबत अनेक समस्या उद्भवू शकतात. आताच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांची पचनसंस्था कमकुवत होते. प्रोबायोटिक्स, प्रीबायोटिक्स, फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे आणि पुरेसे पाणी पिणे हे पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. तुमच्या जीवनशैलीत या उपायांचा समावेश केल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळू शकते.

प्रो-बायोटिक्स असलेले अन्न

दही, ताक आणि काही लोणच्यामध्ये प्रोबायोटिक्स आढळतात. हे चांगले बॅक्टेरिया आपल्या पचनसंस्थेत प्रवेश करतात आणि वाईट बॅक्टेरियांविरूद्ध लढतात. नियमित सेवनाने पचन सुधारते, रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि गॅस, पोट फुगणे किंवा पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते.

प्रीबायोटिक्स असलेले अन्न

प्रीबायोटिक्स हे तंतुमय पदार्थ आहेत, जे प्रीबायोटिक्ससाठी अन्न पुरवतात. यामध्ये कांदे, लसूण, केळी, सफरचंद आणि ओट्स यांचा समावेश आहे. या पदार्थांचे नियमित सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते, आतडे निरोगी राहतात आणि पोटातील अस्वस्थता किंवा गॅस कमी होतो.

उच्च फायबरयुक्त अन्न

चिया सीड्स, बेरी आणि ओट्ससारखे जास्त प्रमाणात फायबर अलेले पदार्थ पचन सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहेत. फायबर पचनास मदत करते, साखरेची पातळी नियंत्रित करते आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण राखते. या पदार्थांचे नियमित सेवन बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि इतर पचन समस्यादेखील कमी करू शकते. आतड्यांचे आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी हे उपाय खूप उपयुक्त आहेत.

हायड्रेटेड रहा

दररोज किमान ८ ग्लास पाणी पिणे महत्त्वाचे आहे. पाणी अन्नाचे पचन करण्यास मदत करते, शरीराला पोषक तत्वे शोषण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळते. योग्य हायड्रेशनमुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत होते, आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि शरीराच्या पेशींची कार्यक्षमता राखली जाते.