डायबिटीज रुग्णांनी कोणत्या रंगाचे खजूर खाल्ल्यास होतो फायदा? ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण | diabetes patients sugar can be controlled by eating these types of dates best diet for dubieties patients nss 91 | Loksatta

डायबिटीज रुग्णांनी कोणत्या रंगाचे खजूर खाल्ल्यास होतो फायदा? ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण

खजूराच्या सेवनामुळं ब्लड शुगर, ग्लायकोसिलेटेड हीमोग्लोबिन, लिपिड प्रोफाइल आणि शरीराच्या वजनावर काय परिणाम होतो?

Dates Benefits For Diabetes Patients
कोणत्या प्रकारचे खजूर खाणे मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर? (Image-Freepik)

Dates Eating Benefits : टाइप २ मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांनी खजूर खाण्यापासून सावध राहिलं पाहिजे. खजूर खाल्ल्यानंतर ब्लड ग्लुकोज, कोलेस्ट्रॉल, शरीराचं वजन किंवा ब्लड प्रेशरवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही. खजूराचं सेवन कमी प्रमाणात खाल्ल्यावर आरोग्यास हानिकारक ठरु शकत नाही, अशी माहिती एका ताज्या सर्वेक्षणातून समोर आलीय. खजूराचं सेवन एका विशिष्ट प्रमाणात केल्यावर तुमच्या शरीरातील ब्लड शुगर वाढत नाही, असंही काही सर्वेक्षणात म्हटलं आहे. ही माहिती फोर्टिस सीडीओसी हॉस्पिटल फॉर डायबिटिज अॅंड एलाइड सायन्सचे चेअरमन डॉ. अनूप मिश्रा आणि तामिळनाडू गव्हर्नमेंट मल्टी-सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे डाएटीशियन डॉ. मीनाक्षी बजाज यांनी केलेल्या स्टडीतून समोर आली आहे.

खजूराच्या सेवनामुळं ब्लड शुगर, ग्लायकोसिलेटेड हीमोग्लोबिन, लिपिड प्रोफाइल आणि शरीराच्या वजनावर काय परिणाम होतो, याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न या स्टडीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. जानेवारी २००९ आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये इज्रायल, सौदी अरब आणि अन्य वेगवेगळ्या देशांतील डेटाबेसची माहिती मिळवून हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. खजूराच्या १७ किस्मांपैकी कोणता मधुमेह रुग्णासाठी लाभदायक आहे, याबाबत जाणून घेतल्याशिवाय खजूराचं सेवन करणं हानिकारक ठरु शकतं.

नक्की वाचा – फळ कापल्यावर किती वेळात खाल्लं पाहिजे? एक्सपर्टकडून जाणून घ्या सविस्तर

खजूराच्या किस्मांचा ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) ४२.८ पासून ७४.६ आणि ग्लायसेमिक लोड (जीएल) ८.५-२४ मध्ये असतं. खजूराचे चार वेगवेगळे प्रकार असतात. किमरी, खलाल आणि सर्वात जास्त वापर व स्टडी केलेला रुताब आणि तामेर. रुताब आर्धा पिकलेला ४२.२,टॅमर (पूर्ण पिकलेला, नैसर्गिकरित्या उन्हात वाळलेला) ४५.३ आणि टॅमर (कमर्शियल) ३५.५१ टॅमर खजूर पूर्ण पिकलेला असतो. या खजूराला वाळवून कडक केलं जातं. सौदी अरबच्या खजूरांमध्ये सर्वात कमी शुगर, जीआई आणि ग्लायसेमिक असतं.

डॉ बजाज सांगतात की, “भारतात उपलब्ध असणाऱ्या खजूरात मीडियम ग्लायसेमिक लोड असतं. टॅमर भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. खजूराच्या काही तुकड्यांत प्रोटिन आणि फायबरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. हे खजूर खाल्ल्याने पोट भरतं आणि शुगरचं प्रमाणही कमी करत. मधूमेह झालेल्या रुग्णांनी खजूर खाणं कमी केलं पाहिजे. सौदी अरबमध्ये २०२२ मध्ये एक अध्ययन केलं गेलं. रुताब आणि टॅमर या खजूरांचे सेवन केल्यावर काय परिणाम होतात, याबाबत वर्षभर एक स्टडी करण्यात आली. हे खजूर खाल्ल्याने ब्लड शुगर आणि एचबीएसीच्या प्रमाणात घट झाल्याचं या अध्ययनाच्या माध्यमातून समोर आलं.”

खजूरात काय काय असतं?

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन (एनआयएन) दिलेल्या माहितीनुसार, १०० ग्रॅम खजूरात ३११ कॅलरी, ९ ग्रॅम फायबर, १ ते ३ ग्रॅम प्रोटीन असतं. या खजूरात सेलेनियम, मॅग्नेशियम, कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम फॉस्फेट आणि मॅंगनीजसारख्या पोषक तत्वांचं प्रमाण अधिक असतं. ” २०१८ मध्ये एका सर्वेक्षणात समोर आलं की, सुकलेले ब्राउन रंगाचे खजूर एनीमियासाठी चांगले ठरु शकतात. अशाप्रकारच्या १०० ग्रॅम खजूरात ४.७० मिलीग्रॅम आयर्न असतं. टॅमेस्ट्रिट खजूर एलडीएल कोलेस्ट्रॉलला २१ दिवसांपासून ६ महिन्यांपर्यंत कमी करु शकतात. ज्या मधूमेह नाही अशा लोकांसाठी हे लागू होतं.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 13:04 IST
Next Story
वयाच्या ६१ व्या वर्षी संजय दत्तने केली होती कॅन्सरवर मात; स्टेज ४ कॅन्सर असतानाही कसा केला पराभव जाणून घ्या