Weight Loss Drink: आपल्यापैकी अनेकजण स्वतः वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असतील, अगदीच नाही तर अशा कोणाला ओळखत असतील जे आपल्या वजनाला घेऊन चिंतेत आहेत. अशा मंडळींना वजनापेक्षा जास्त वजन कमी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सल्ल्यांचा जास्त वैताग येतो. प्रत्येकाकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकताना नेमकं करावं काय हे आपल्यालाही अनेकदा कळत नाही. अशावेळी सर्वात सोपा उपाय म्हणजे डॉक्टरांचा सल्ला. आज आपण तज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन दिलेल्या सल्ल्याची डॉक्टरांनी केलेली पडताळणी जाणून घेणार आहोत. हा व्हायरल सल्ला म्हणजे कॉफी व लिंबू एकत्र पिणे. आजवर आपण लेमन टी हा प्रकार ऐकला असेल पण लेमन कॉफी म्हणजे काय व खरंच याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होऊ शकतो का हे जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॉफीच्या सेवनाने वजन कमी होते का? Does Coffee Help You Lose Weight?

कविता सांगतात की, तुम्ही एक पॅकेट चिप्स खाण्याआधी जर एक ग्लास पाणी प्यायलात तर तुमची भूक झटपट कमी होते. जर तुम्ही दोन ग्लास पाणी प्यायलात तर तुम्हाला काही खाण्याची इच्छाही होत नाही. ७० ते ८० या दशकात अनेक मॉडेल्स रॅम्प वॉकआधी कॉफी प्यायच्या.

कॉफीमुळे आपल्या शरीरातील बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) वाढतो. कॅफिन न्यूरोट्रांसमीटर एडेनोसिन ला ब्लॉक करण्याचे काम करतो तसेच डोपामाइन या न्यूरोट्रांसमीटरला वाढवण्यास मदत करते. जर आपल्याला मेटाबॉलिक रेट अधिक वाढवायचा असेल तर एका दिवसात अधिकाधिक कॉफीचे सेवन करावे लागेल पण असे केल्याने आपल्या स्वास्थ्यावर अगदीच विपरीत परिणाम होऊ शकतो.

लिंबाच्या सेवनाने वजन कमी होते का? Does Lemon Water Help You Lose Weight?

वजन कमी करण्यासाठी अनेक तज्ज्ञ लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. कविता सांगतात की, लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी ऑक्सिडंट्स, फोलेट व अन्य खनिजे असतात, यामुळे आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यात मदत होऊ शकते. याशिवाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यास सुद्धा यामुळे मदत होऊ शकते. लिंबू पाणी प्यायल्यावर त्यातील क्षार आपला पोटाच्या विकारांपासून बचाव करू शकतात. तर शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी सुद्धा याची मदत होते.

हे ही वाचा<< तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती हवे? आजारांना दूर ठेवा, परफेक्ट बॉडीसाठी ‘हा’ सोपा तक्ता पाहा

कॉफी व लिंबू प्यायल्याने वजन होते कमी?

दरम्यान, कॉफी व लिंबू यांचे अलिप्त फायदे असले तरी एकत्र त्यांचे सेवन केल्याने तुमचे वजन कमी होईलच याची काही शाश्वती नाही. आहारतज्ज्ञ कविता देवगन यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, कॉफी व लिंबू आपल्याला वजन कमी करण्यास मदत करू शकतील याचे काही ठोस पुरावे नाहीत पण या पेयाच्या सेवनाने आपली भूक नियंत्रणात राहते किंबहुना कमी होते. जेव्हा तुम्ही कॅफिनचे सेवन करता तेव्हा अधून मधून लागणारी छोटी भूक कमी होते व सतत खात राहण्याची इच्छा मिटते. त्यामुळे व्हायरल ट्रिक्सच्या अंधानुकरणाला बळी पडू नका.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ideal weight as per height with help of coffee and lemon water drink what is easiest diet for weight loss svs