Kitchen jugad: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
तुम्ही कधी कुकरमध्ये कापूस टाकून पाहिलाय का? आता तुम्ही म्हणाल कापूस आणि कुकरमध्ये ? हो आपण सगळेच पैसे बचत करण्यासाठी काही ना काही करत असतो. अशाच एका महिलेनं पैसे वाचवण्यसाठी भन्नाट जुगाड सांगितला आहे.
कुकरमध्ये भात, भाजी, पुलाव/ खिचडी अनेकदा करपून जाते. मग असा करपट कुकर कितीही घासला तरी निघत नाही. कुकरच्या करपटपणा गेला नाही तर पदार्थांचा स्वाद बिघडतो तसेच कुकरमध्ये आरोग्यास हानिकारक जिवाणुंची वाढ होण्याचाही धोका असतो. यामुळे कुकरमध्ये वासही यायला लागतो. हाच वास घालवण्यासाठी हा सोपा उपाय नक्की करा. या महिलेनं व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार एक कापूस घ्यायचा आणि त्यावर थोडसं वॅसलीन लावायचं. यानंतर हा कापूस थोडासा जाळायचा, कुकरमध्ये टाकायचा आणि झाकण बंद करायचं. यानंतर काही मिनिटांतच कुकरमधला सर्व वास दूर होतो.
पाहा व्हिडीओ
तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. गृहिणीनं अतिशय सोपा जुगाड दाखवला आहे. ही ट्रिक पाहून अनेकजण अचंबित झालेले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ Puneri tadka नावाच्या यूट्यूब अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.