Relationship Tips : ब्रेकअपनंतरही जोडीदाराची आठवण येते? मग या टिप्स घेऊन नव्याने सुरुवात करा

प्रेमात सारं काही चांगलं दिसतं, पण तुमचं प्रेमच तुमच्यापासून दूरावलं की सारं काही संपल्यासारखं वाटतं. ब्रेकअपनंतर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची आठवण असेल आणि यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर या टिप्स एकदा वाचाच.

Breakup-Tips

How To Deal With Breakup: प्रेम ही जीवनातील सर्वात सुंदर भावना आहे. प्रेमात सारं काही चांगलं दिसतं, पण तुमचं प्रेमच तुमच्यापासून दूरावलं की सारं काही संपल्यासारखं वाटतं. हल्ली तर जितक्या लवकर रिलेशनशीप तयार होते आणि दोन व्यक्ती नात्यात येतात, तितक्याच सहजपणे नातं तुटतं. जोडप्यांमध्ये ब्रेकअप होणं सामान्य झालं आहे, परंतु अनेकदा प्रेमाने सुरू झालेलं नातं भांडणात संपतं.
गैरसमज, राग किंवा इतर कोणत्याही कारणाने कपल वेगळे होतात. पण ब्रेकअपमधून क्षणार्धात सावरणं त्यांच्यासाठी कठीण होऊन बसतं. ब्रेकअपनंतर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची आठवण येते. तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे, पण तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी आणि लोक तुम्हाला नकळत तुमच्या जोडीदाराबद्दल विचार करायला लावतात.

कधीकधी तुम्हाला तुमच्या जोडीदाराची आणि त्या नात्याची इतकी सवय होते की तुटलेले मन सुधारण्यासाठी आणि ब्रेकअपच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी अनेक वर्षे लागतात. तुम्ही सुद्धा तुमच्या माजी प्रियकर/प्रेयसीला मिस करत असाल आणि ब्रेकअपच्या वेदनेतून बाहेर पडू शकत नसाल, तर या सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही नव्याने सुरुवात करू शकता.

आणखी वाचा : Beauty Tips : मान काळी पडलीय? ‘हा’ घरगुती उपाय करा, नक्की होईल फायदा

स्वत: मध्ये व्यस्त
ब्रेकअपनंतर तुमच्या तुटलेल्या नात्याबद्दल आणि एक्सबद्दल विचार करणं थांबवा. हे करणं अवघड आहे. पण अशक्य नाही. स्वतःला व्यस्त ठेवा. इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल आणि तुम्ही एक्सच्या आठवणीतून बाहेर पडाल.

संपूर्ण बदल आवश्यक आहे
जेव्हा तुम्ही दीर्घकाळ नातेसंबंधात असता तेव्हा तुमचं आयुष्य तुमच्या जोडीदाराभोवती फिरू लागतं. उदाहरणार्थ, जोडीदाराची निवड स्वीकारणं, एकमेकांच्या सोबतीने दिनचर्या सुरू करणं. पण ब्रेकअपनंतर तुम्हाला या सवयी सोडाव्या लागतील. तुमच्या आवडी-निवडी आणि रुटीन तुमच्यानुसार ठरवावे लागेल. याशिवाय, तुमच्याकडे तुमच्या एक्सच्या अनेक गोष्टी आणि भेटवस्तू असू शकतात. तुम्हाला नव्याने सुरुवात करायची असेल तर या गोष्टी स्वतःपासून दूर करा.

आणखी वाचा : Health Tips : तुमच्या अशा सवयींमुळे स्वादुपिंड खराब होतो, गंभीर समस्यांचा धोका वाढतो

कुटुंब आणि मित्रांना वेळ द्या
ब्रेकअपनंतर लोकांना एकटं राहायचं असतं. त्याला असं वाटतं की तो त्याच्या तुटलेल्या नात्याबद्दल मित्र किंवा कुटुंबाशी बोलू शकत नाही. ते त्यांच्या मनात ही चूकीची समजूत ठेवतात. परंतु अशा वेळी तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत असणं आवश्यक आहे. त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवा. पिकनिक किंवा सहलीची योजना करा आणि तुमचा मूड फ्रेश करण्यासाठी बाहेर जा.

आणखी वाचा : Health Tips : रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या, हे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

जीवनात नवीनता आणा
जेव्हा तुमच्या आयुष्यात काही नवीन घडते, तेव्हा तुम्ही त्याबद्दल उत्सुक असता. ब्रेकअपनंतर या तर्काचा अवलंब करून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. जसे की तुम्ही तुमचा वेळ काहीतरी नवीन शिकण्यात घालवू शकता. तुमच्या आवडीनुसार नवीन कौशल्य, प्रशिक्षण किंवा कोर्समध्ये सामील व्हा. यामुळे तुमच्या भविष्यातही फायदा होईल आणि जीवनात जिज्ञासा वाढेल. नवीनपणा म्हणजे ब्रेकअप झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या नात्यात जाणे असा नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Relationship tips getting over 4 easy ways to forget ex after breakup prp

Next Story
Beauty Tips : मान काळी पडलीय? ‘हा’ घरगुती उपाय करा, नक्की होईल फायदा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी