Viral Video : तवा हा स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. नियमित पोळ्या किंवा पराठे किंवा धपाटे बनवण्यासाठी आपण तव्याचा वापर करतो. वापरल्यानंतर तवा वारंवार काळा पडतो. खूप प्रयत्न करुनही तवा स्वच्छ होत नाही पण आज आम्ही तुम्हाला एक सोपी आणि स्वस्त ट्रिक सांगणार आहोत. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही काळा तवा नव्यासारखा चमकवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फक्त दोन रुपयांचा शॅम्पू

तवा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन रुपयांचा कोणताही शॅम्पू विकत घ्यायचा आहे. या शॅम्पूच्या मदतीने तुम्ही तवा स्वच्छ करू शकता. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शॅम्पूच्या मदतीने तवा स्वच्छ कसा करता येईल, हे दाखवले आहे. सध्या हा किचन जुगाड चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओत तु्म्हाला एक काळा पडलेला तवा दिसेल. हा काळा पडलेला तवा गॅसवर ठेवला आहे.गरम तव्यावर दोन रुपयांचा शॅम्पू टाकायचा. त्यानंतर चमच्याने शॅम्पू तव्यावर पसरुन घ्यायचा. त्यावर लिंबूचा रस पिळायचा. आणि चमच्यान तव्यावर पसरुन घ्यायचे. शेवटी पाणी टाकायचे आणि लिंबूने तवा चांगला घासून घ्यायचा.त्यानंतर तवा स्वच्छ धुवून घ्या.तु्म्हाला तवा नव्यासारखा दिसेल.फक्त दोन रुपयांच्या शॅम्पूच्या मदतीने तुम्ही स्वच्छ करू शकता.

हेही वाचा : Saree Hacks : रबर बँडच्या मदतीने करा परफेरक्ट साडीच्या निऱ्या; अनोखा जुगाड, पाहा VIDEO

ankitanoop8 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गरम तव्यावर शॅम्पू टाकल्यावर चमत्कार पाहा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. काही युजर्सना ही खास ट्रिक आवडली आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two rupees shampoo clean black tawa how to clean iron tawa with the help of shampoo home remedies ndj