पाणी हे शरिरासाठी महत्वाचे आहे. शरीरात आवश्यक प्रमाणात पाणी असल्यास रक्तदाब नियंत्रणात राहते. अन्यथा शरीराला अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे पाणी पित राहिले पाहिजे. मात्र काही लोक दर तासाला सामान्यापेक्षा अधिक प्रमाणात पाणी पितात. जोरदार तहान लागल्याचे हे परिणाम आहे. या वैद्यकीय स्थितीला पोलिडिप्सिया देखील म्हणतात. हा आजार असल्यास तातडीने चिकित्सकाला संपर्क साधला पाहिजे. तसेच अधिक तहान लागणे हे इतर आजारांचे देखील लक्षण असू शकते. याबाबत जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) मधुमेह

आवश्यक्तेपेक्षा अधिक तहान लागणे हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. मधुमेह असताना शरीराला द्रव्यपदार्थांवर योग्यरित्या नियंत्रण ठेवणे कठीण जाते. त्यामुळे अधिक तहान लागणे हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. अधिक तहान लागल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले पाहिजे. मधुमेह असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

(चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, त्वचाही उजळेल)

२) अनिमिया

शरिरातील लाल रक्तपेश्या घटल्यास अनिमिया हा आजार होतो. याला रक्ताची कमतरता देखील म्हटले जाते. अशा परिस्थितीत भरपूर तहान लागते. अनिमिया असल्यास डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

३) ड्राय माऊथ

ड्राय माउथमुळे थोड्या थोड्या वेळाने पाणी पिण्याची इच्छा होते. तोंडातील ग्रंथी जेव्हा योग्य प्रकारे लाळ तयार करू शकत नाहीत तेव्ह तोंड कोरडे होते. यामुळे तोंडाला संसर्ग आणि वास येण्याची समस्या देखील होते.

(उभे असताना चक्कर येण्यामागे ‘ही’ कारणे असू शकतात)

४) डिहायड्रेशन

डिहायड्रेशन हा आजार नाही. पण एक वैद्यकीय अवस्था आहे. जेव्हा तुमच्या शरीरात पाण्याची कमी होते तेव्हा या स्थितीला डिहायड्रेशन म्हणतात. डिहायड्रेशनमुळे चक्कर येणे, डोके दुखणे, उल्टी येणे आणि अशक्तपणा जाणवू शकतो. भरपूर तहान लागण्यामागे डिहायड्रेशन हे कारण असू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the reasons behind getting more thirsty ssb