What happened to Satish Shah? : मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. त्यांचे मित्र अशोक पंडित यांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. मात्र, सतीश शहा यांना नेमकं काय झालं होत? ते कोणत्या आजारानं ग्रस्त होते. त्याची कारणं काय? आणि आपण त्याबाबत कशी खबरदारी घेऊ शकतो हे जाणून घेऊयात.
अभिनेते सतीश शहा यांना काय झालं होतं?
मूत्राशयाचा आजार हा सर्रास सर्वांमध्ये दिसून येतो. खरं तर वेळेवर न जेवणं, कमी पाणी पिणं किंवा अपुरी झोप ही त्यामगची सर्वांत मोठी कारणं आहेत मूत्राशयाच्या आजाराची. अभिनेते सतीश शहा हेदेखील या आजाराने ग्रासले होते.किडनी हा आपल्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. किडनी प्रामुख्याने युरिया, क्रिएटिनिन, अॅसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्ताला फिल्टर करण्यासाठी मदत करते. दुखापत, उच्च रक्तदाब किंवा मधुमेहामुळे मूत्रपिंड खराब झाल्यास ते शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करू शकत नाही, ज्यामुळे शरीरात विष तयार होते. अशा स्थितीत किडनी नीट काम करत नाही आणि विषारी पदार्थ जमा होत जातात. चुकीच्या जीवनशैलीमुळे सेलिब्रिटींमध्ये या आजाराचं प्रमाण वाढत आहे.
मुत्राशयाच्या आजाराची नेमकी कारण काय ?
स्वत:च्या शरीराला पुरेसा वेळ न देणे, स्वत:ची काळजी न घेणे. सेलिब्रिटी असो किंवा वर्किंग माणसे धावपळीच्या आयुष्यात वेळेवर जेवण न करणे, पुरेसे पाणी न पिणे याबरोबर सर्वांत मोठे कारण म्हणजे अपुरी झोप. होतं काय तर अपुऱ्या झोपेमुळे शरीराची झीज जास्त होते. मूत्रामध्ये मिठाचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे मूत्राशयाचे आजार बळावतात. युरीन इन्फेक्शन होण्याची तशी अनेक कारणे आहेत. मात्र त्यात अपुरी झोप हेदेखील मोठे कारण आहे. दिवसभर शूटिंग किंवा इतर आऊटडोर कामांमुळे लघवी रोखून ठेवली जाते. त्यामुळेदेखील हे आजार जास्त बळावतात. त्याबरोबर येतं ते सर्वांत मोठं कारण म्हणजे ताणतणाव. मानसिक नैराश्याचा सर्वांत गंभीर परिणाम मूत्राशयावर होतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
बचाव करण्यासाठी उपाय
- लघवी रोखू नका.
- दिवसातून ६ ते ८ ग्लास पाणी पिणे महत्वाचे आहे.
- क्रॅनबेरीचा रस, प्रोबायोटिक्स आणि व्हिटॅमिन सी समृद्ध
- लिंबूवर्गीय फळे UTI टाळण्यासाठी मदत करू शकतात.
- पुरुषांनी स्वच्छतेची खूप काळजी घेतली पाहिजे. जननेंद्रियाच्या
- भागात पावडर आणि स्प्रेचा वापर कमी करा.
