Cardamom water benefits: वेलची हा एक सुगंधी आणि औषधी मसाला आहे, जो “मसाल्यांची राणी” म्हणून ओळखला जातो. शतकानुशतके भारतीय पाककृतींमध्ये त्याचा वापर केला जात आहे. वेलचीचा वापर मिठाई, चहा, बिर्याणी, करी आणि बहुतेक पदार्थांमध्ये केला जातो. हा मसाला केवळ त्याच्या चव आणि सुगंधासाठी ओळखला जात नाही तर त्यात औषधी गुणधर्मदेखील आहेत. त्यामध्ये आढळणारे फायटोकेमिकल्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी संयुगे शरीरातील जळजळ, संसर्ग आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात.

हेल्थलाइनच्या मते, वेलचीमध्ये विविध प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि नैसर्गिक तेल असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. त्यात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसदेखील असतात, जे हाडे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. त्यात सिनेओल आणि टेरपीनसारखी आवश्यक तेलं असतात, जी बॅक्टेरिया आणि बुरशीशी लढण्यास मदत करतात. दररोज रात्री झोपण्यापूर्वी वेलचीचे पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक ठरू शकते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी वेलचीचे पाणी प्यायल्यास त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.

बॅक्टेरियाच्या संसर्गापासून संरक्षण करते

वेलचीमध्ये शक्तिशाली बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. असंख्य अभ्यासातून असे दिसून आले आहे की, वेलची खाल्ल्याने अनेक हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात. हा मसाला हिरड्यांचे संक्रमण आणि तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. वेलचीमधील संयुगे बॅक्टेरियाच्या पेशींच्या भिंतींना नुकसान करतात, त्यांची वाढ रोखतात. दररोज रात्री वेलचीचे पाणी प्यायल्याने शरीराचे बॅक्टेरियापासून संरक्षण होते.

मधुमेह आणि चयापचय सिंड्रोमसाठी फायदेशीर

काही संशोधनातून असे दिसून आले आहे की, वेलची मेटाबॉलिक सिंड्रोमच्या अनेक पैलूंवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते. जसे की लठ्ठपणा, उच्च रक्तदाबातील साखर, रक्तदाब आणि वाईट कोलेस्ट्रॉल. २०२१ च्या एका अभ्यासात असे आढळून आले की, ज्या महिलांनी दोन महिने दररोज ३ ग्रॅम वेलची खाल्ली, त्यांच्यात एलडीएल (वाईट कोलेस्ट्रॉल) कमी आणि एचडीएल (चांगले कोलेस्ट्रॉल) जास्त होते. २०२३ च्या एका पुनरावलोकनात असेही आढळून आले की, वेलची जळजळ कमी करते आणि रक्तदाब नियंत्रित करते. दररोज झोपण्यापूर्वी वेलचीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहण्यास मदत होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

वेलचीमधील बायोॲक्टिव्ह संयुगे जळजळ कमी करण्यास आणि कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स नियंत्रित करण्यास मदत करतात. नियमित सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.

तोंडाचे आरोग्य सुधारते

वेलचीचा रस पाण्याच्या स्वरूपात प्यायल्याने तुमचे तोंडाचे आरोग्य सुधारेल. तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी शतकानुशतके या रसाचा वापर केला जात आहे. त्याचे अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडात बॅक्टेरियाची वाढ रोखतात, ज्यामुळे हिरड्यांना सूज येणे, पोकळी आणि दुर्गंधी यांसारख्या समस्या कमी होतात.

यकृताला विषमुक्त करते

आयुर्वेदात वेलची हा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणारा मसाला मानला जातो. आधुनिक संशोधनात असेही आढळून आले आहे की, वेलची यकृताचे औषधांमुळे किंवा रसायनांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करू शकते. अभ्यासात असे आढळून आले की, वेलचीने यकृतावरील औषधांचे हानिकारक परिणाम कमी केले, त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताणदेखील कमी झाला, ज्यामुळे यकृताचे आरोग्य सुधारले.

हे पाणी पचन आणि पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे

आल्याप्रमाणे वेलचीदेखील पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. हा मसाला गॅस, अपचन आणि पोटदुखीसारख्या समस्यांपासून आराम देतो. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की वेलची तेल पोटाच्या आवरणाचे रक्षण करते आणि अल्सर तयार होण्यास प्रतिबंध करू शकते.