Why Does Breast Size Increase Rapidly: अनेक महिलांना सुडौल स्तनांचे भारी आकर्षण असते. गूगल सारख्या सर्च इंजिनवर तसेच Quora सारख्या मंचावर अनेक महिला आपल्या स्तनांच्या आकारावरून प्रश्न विचारत असतात. बहुतांश वेळा मोठ्या आकाराचे स्तन हे सौंदर्याचे प्रतीकही मानले जाते, पण स्तनांचा मोठा आकार हा नियमित आयुष्यात किती व कशा अडचणी निर्माण करतो हे एक महिलाच जाणून असते. अगदी अंतर्वस्त्रे निवडण्यापासून ते व्यायामापर्यंत, इतकंच नव्हे तर खाली वाकताना, वेगाने हालचाल करताना, आवडतं जॅकेट घालतानाही हे मोठे स्तन अनेकदा अडथळा ठरू शकतात. काहींच्या बाबतीत तर मोठे स्तन हे पाठदुखी, कंबरदुखीचेही मुख्य कारण ठरतात. स्तनांचा आकार नेमका कोणत्या कारणाने वाढतो या प्रश्नाबाबत अनेकांना कुतुहूल असते. आज आपण स्तनांचा आकार वाढण्यामागील सात प्रमुख व संभाव्य कारणे जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लक्षात घ्या जर स्तनांचा आकार हा नैसर्गिकच मोठा असेल तर त्यात घाबरून जाण्याचे कारण नाही पण जर कमी कालावधीत अचानक स्तन मोठे होऊ लागले तर हे प्रकरण थोडं गंभीरतेने घ्यायला हवं, अशावेळी आपण स्त्रीरोग तज्ञांचाही सल्ला घेऊ शकतात. तर चला पाहुयात अशी कोणती करणे आहेत ज्यामुळे स्तनांचा आकार वेगाने वाढू लागतो..

मासिक पाळी

मासिक पाळीच्या चक्रात शरीरात अनेक बदल होत असतात, जेव्हा गर्भाशयातून एग्ज रिलीज केले जातात तेव्हा शरीरात प्रोजेस्टेरॉन व एस्ट्रोजन हार्मोन्सचे प्रमाण अचानक वाढू लागते यामुळेच मासिक पाळीच्या दिवसांमध्ये तुम्हाला शरीर जड वाटू शकते. याचा परिणाम काही अंशी स्तनांच्या आकारावरही दिसून येतो.

प्रेग्नन्सी

गरोदरपणाच्या दिवसात शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात यामुळेही स्तनांचा आकार वाढू शकतो. गर्भवती महिलेच्या गर्भारपणात स्तनांच्या उतींमध्ये रक्त प्रवाह वाढल्याने स्तनांचा आकार वाढण्याची शक्यता असते.

वाढते वजन

जर आपल्याला वरील दोन्ही परिस्थिती लागू होत नसतील आणि तरीही स्तनांचा आकार वेगाने वाढत असेल तर कदाचित तुमच्या आहाराकडे लक्ष देणे योग्य ठरेल. अनेकदा अधिक कॅलरीजयुक्त आहारामुळे स्तनाच्या उती, पेशी व टिश्यूजमध्ये फॅट्स जमा होऊ लागतात. अशात केवळ स्तनच नव्हे तर तुमचे एकूण वजनही वाढण्याची शक्यता असते.

व्यायामाचा अभाव

एकीकडे तुमचा आहार अधिक कॅलरीजयुक्त असेल आणि दुसरीकडे तुम्ही व्यायामही करत नसाल तर शरीरातील फॅट्स वितळण्याचा मार्गच उरत नाही. अनेक महिला या मोठे स्तन असल्यानेही व्यायाम करणे टाळतात मात्र योग्य व योग्य व्यायामाने केवळ स्तनच नव्हे तर आपण संपूर्ण शरीराचे वजन व आकार नियंत्रित ठेवू शकता.

सेक्स

सेक्समुळे स्तनांचा आकार वाढणे याबाबत अनेकांची अनेक मतं असतात, काही स्त्रीरोग अभ्यासकांच्या मते सेक्स व स्तनांच्या आकाराचा काहीच संबंध नसतो तर काहींच्या मते संभोग केल्याने नाही तर फोरप्लेमुळे स्तनांचा आकार वाढू शकतो.

गर्भनिरोधक गोळ्या

गर्भनिरोधक गोळ्यांचा गर्भाशयासह शरीरावरदेखील परिणाम होतो, यातील घटकांमुळे शरीरात हार्मोनल क्रियांना वेग मिळतो परिणामी स्तनांचा आकार वाढू शकतो.

तुमच्या उंचीप्रमाणे तुमचे वजन किती असायला हवे? Perfect बॉडी साठी पाहा सोप्पा तक्ता

स्तनांमध्ये गाठ होणे

अत्यंत दुर्मिळ घटनांमध्ये स्तनांचा आकार वाढण्यामागे स्तनांमध्ये गाठ होणे हे कारण असू शकते. स्तनांमधील गाठ जाणवत असेल तर वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल.

(टीप- वरील लेख हा माहितीपर आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is perfect bra size can sex cause bigger breast 7 reasons why breast size increases check these symptoms svs