तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी योजना आखत असाल, तर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तुम्ही तिला खास भेट देऊ शकता. या योजनेत थोडे पैसे गुंतवून तुम्ही तुमच्या मुलीसाठी लाखो रुपये जमा करू शकता. या योजनेत पैसे गुंतवल्यास भविष्यात मुलीला कोणत्याही पैशाची अडचण येणार नाही. यासोबतच तुम्हाला कर सवलतीचाही लाभ मिळेल. ही सरकारी योजना दुसरी कोणतीही नसून सुकन्या समृद्धी योजना आहे, ज्यामध्ये ४१६ रुपयांच्या बचतीसह ६५ लाखांची रक्कम मॅच्युरिटीवर मिळवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुकन्या समृद्धी योजनेत दीर्घकालीन गुंतवणूक करता येते. या योजनेतून तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी वेळोवेळी पैसेही दिले जातात. तसेच मॅच्युरिटी किंवा लग्नाच्या वेळी या योजनेचा मोठा फायदा होऊ शकतो. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर लाभ मिळतो. तसेच ७.६ टक्के परतावा देखील मिळतो. जर तुम्हाला या योजनेत पैसे गुंतवायचे असतीलतर तुम्ही पोस्ट ऑफिस अंतर्गत खातं उघडू शकता. ही एक लोकप्रिय योजना असून १० वर्षांपर्यंतच्या मुलींना सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्याची परवानगी आहे. यामध्ये वार्षिक किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये ठेवण्याची परवानगी आहे. मुलगी २१ वर्षांची झाल्यावर ही योजना परिपक्व होते. तथापि, मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यावर या योजनेत गुंतवलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम ती काढू शकते. ज्याचा उपयोग ती तिच्या शिक्षणासाठी करू शकते. तर संपूर्ण रक्कम वयाच्या २१ व्या वर्षीच काढता येते. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त दोन मुलींना लाभ दिला जातो, मात्र एका कुटुंबात जुळ्या मुली असल्यास ३ मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. यामध्ये १५ वर्षांसाठीच पैसे जमा करावे लागतील. मॅच्युरिटीवर तुम्हाला हवी असलेली रक्कम लक्षात घेऊन तुम्ही आगाऊ गुंतवणूक करू शकता. त्या आधारावर गुंतवणूक सुरू करू शकता.

Women’s Day 2022: पत्नीच्या नावाने गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या यावर कशापद्दतीने आकारला जातो कर

जर तुमची मुलगी १० वर्षांची असेल आणि तुम्ही आता गुंतवणूक करायला सुरुवात केली असेल, तर तुमच्याकडे फक्त ११ वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय असेल. ५ वर्षांची मुलगी असेल तर तुम्ही १६ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकाल. तुमची मुलगी २०२१ मध्ये १ वर्षाची असताना आणि गुंतवणूक सुरू केली २०४२ मध्ये योजना परिपक्व होईल.

६५ लाख रुपये कसे मिळणार?

२०२१ या वर्षात मुलगी एका वर्षांची असेल आणि गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असेल. तर दररोज ४१६ रुपये खात्यात जमा करा. त्यामुळे महिन्याला १२,५०० रुपये जमा होतील. म्हणजेच ही रक्कम या योजनेत दरमहा जमा केली तर वर्षभरात १,५०,००० रुपये जमा होतील. त्याच वेळी १५ वर्षांत ही गुंतवणूक २२,५०,००० रुपये होतील. ७.६ टक्के व्याज दराने एकूण व्याजाची रक्कम ४२,५०,००० रुपये असेल. तर २०४२ मध्ये मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तिला परिपक्वतेवर ६५,००,००० रुपये मिळतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens day sukanya samruddhi yojna 416 rupees investment get 65 lakh rmt