हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, धार्मिक ठिकाणे आणि न्यायालय यांच्या १०० मीटर परिसरातील क्षेत्राला शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.
अर्थात कायद्याच्या अंमलबजावणीबाबत हीच परिस्थिती अनेक ठिकाणी होती आणि आजही आहे. ध्वनिप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियमावलीनुसार महाराष्ट्रातील दांडियाच्या वेळेवर बंधन आणावे अशी कायदेशीर नोटीसच डॉ. ओकांनी २००१ साली राज्य शासन आणि संबधितांना पाठवली. त्याचा योग्य तो परिणाम झाला, पण पळवाट काढत वर्षांतील १५ दिवस २ तासांची मुदतवाढ देण्याचा अधिकार पर्यावरण मंत्रालयाने राज्य शासनास २००२ साली दिला. अर्थात त्यावरदेखील सध्या वाद सुरू असून त्यासंदर्भात रिट पिटिशन दाखल केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2014 रोजी प्रकाशित
असा बसला आवाजावर वचक
डॉ. यशवंत ओक यांनी ७०-८०च्या दशकात ध्वनिप्रदूषणाबद्दल आवाज उठविला तेव्हा असे काही असते का असाच प्रश्न त्यांना विचारला गेला होता.

First published on: 12-09-2014 at 01:38 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noise pollution in ganesh festival