साऊथ जॉर्जिया व साऊथ सँडविच आयलंड्स हा भाग अटलांटिक महासागराच्या दक्षिणेला ध्रुवाकडील भागात सुळके, पठार, खडकाळ भाग अशा स्वरूपात आहे. पैकी साऊथ जॉर्जियाची लहानलहान बेटे १७० किमी परिसरात पसरली आहेत, तर त्याच्यापुढे ५२० किमीवर साऊथ सँडविच आयलंड्स आहे. भौगोलिक रचनेमुळे साऊथ जॉर्जियाचा किनारा व्हेल माशाच्या जबडय़ासारखा दिसतो. अटलांटिकच्या परिसरातल्या या भागात असलेल्या डोंगरकडय़ांमुळे समुद्रावरील वारे अडवले जातात. इथे नोव्हेंबर ते एप्रिलच्या काळात थोडे उबदार वातावरण असते. त्यामुळे सील, व्हेल, पेंग्विन्स, आल्बट्रॉस, पेट्रल्स, स्कुवा या पक्ष्यांचे आपल्या पिलांच्या संगोपनासाठी त्या काळात इथे वास्तव्य असते.
सतराव्या-अठराव्या शतकात पोलर रेसमध्ये ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश युरोपियन देशातले दर्यावर्दी प्राणांची पर्वा न करता हिरिरीने उडी मारत होते. त्यांची एक तऱ्हा, तर व्हेल माशांची शिकार करायला येणाऱ्या फिशरमन्सची वेगळी. सॅलीसबरीप्लेन, ग्रेट व्हिकन या भागांत तर त्यांनी व्हेलिंगसाठी तळच ठोकला होता. त्या काळात म्हणजे १९०६ ते १९६२ पर्यंत पन्नास ते साठ हजार व्हेल माशांची निर्घृण हत्या
अंटाकर्ि्टकाच्या सफरीत जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी भेट द्यायला जातो तेव्हा आपली ये-जा झोडियाकमधूनच होते. प्रत्येक आयलंडवर आपले आगळेवेगळे स्वागत होते ते एक तर पेंग्विन्सच्या कलकलाटाने किंवा एलिफंट सीलच्या गुरगुराटाने. नर सील मासे आपापले क्षेत्र व जनानखाना सांभाळण्यात मुळीच हयगय करत नाहीत. दुसऱ्या कुणा नराची आपल्या क्षेत्रात अरेरावी मुळीच चालू देत नाहीत. अगदी रक्तबंबाळ होऊन परक्याला हुसकावून लावेपर्यंत द्वंद्व चालूच राहते. आम्हालाही त्यांच्यापासून २५ मीटर अंतर ठेवूनच फिरायची सक्त ताकीद होती.
सॅलीसबरीप्लेन हे किंग पेंग्विन्सचे माहेरघर. पांढरेशुभ्र अंग, काळे पंख, टोकदार चोच, कानाजवळ व मानेवर सोनेरी रंगाची पिसे असलेले किंग हे खरंच राजस दिसतात. एम्परर पेंग्विन्सही असेच; पण काहीतरी फरक आहे असे म्हणतात. या ठिकाणी आपले स्वागत होते ते त्यांच्या कलकलाटाने. नोव्हेंबर-डिसेंबर हा तिथला वसंत सुरू होण्याचा काळ. थंडीत मादी आपल्या पिलांसाठी चारा आणायला समुद्रात गेलेली असते. मांसाहारी लोक ज्याला करंदी, जवळा म्हणतात ते क्रील हा त्यांचा खुराक असतो. थंडीच्या दिवसांत नर आपल्या पायांवर अंडे किंवा पिल्लू सांभाळत उभा असतो.
पेंग्विन हा असा एकमेव पक्षी आहे की पाण्याच्या खालीच कित्येक महिने असतो. त्या काळात मादी जवळजवळ ३०० किलो क्रील खाते असे म्हणतात. थंडीचा मोसम संपल्यावर मादी परतते. मादीला पाहिल्यावर खूश होऊन तिचे नवरोजी साद घालायला लागतात. मादी आवाज बरोबर ओळखून आपल्याच
काही पिल्ले थंडी न सोसल्याने मरून जातात. त्यांचा फडशा पाडण्यासाठी स्कुवा, पेट्रल्स असतातच. अगदी आपल्या बाळांप्रमाणेच आईवडिलांच्या सान्निध्यात त्यांची पिल्लेही लाडात येतात. हे दृश्य बघून फार गंमत वाटते. आपल्या पिल्लाला भरवताना दुसरे पिल्लू आले तर मादी त्याला हुसकावून लावते. टी.व्ही.वर डिस्कव्हरीमधला सीन अगदी डोळ्यांसमोर घडत होता. काही बिचारी चीत्कारत आपल्या आईला केविलवाणे शोधत होती. आपल्याकडेच हॉस्पिटलमध्ये कधीकधी बाळाची चोरी होते असे नाही, तर इथेसुद्धा एखादी मादी दुसरीचे पिल्लू चोरायला मागेपुढे पाहत नाही. एके ठिकाणी तीन पेंग्विन्स
सॅलीसबरीप्लेन हे किंग पेंग्विन्ससाठी, तर प्रायन आयलंड हे जायंट पेट्रल्सच्या नेस्टिंगसाठी प्रसिद्ध आहेत. इथली आमची भेट खास हे पाहण्यासाठीच होती. आयलंडवर असलेल्या झुडूपांमध्ये त्यांची पिल्ले वाढत असतात. नावाप्रमाणेच जायंट पेट्रल्सचा एकेक पंख १० ते १२ फूट लांबीचा असतो. तो आपल्या डोक्यावरून उडत गेला तर एखादे चार्टर विमान गेल्यासारखेच वाटते. हे पक्षी आपल्या पिलांचे संरक्षण करण्यात तत्पर असतात. जरा जरी संशय आला तर पंखांचा फटका मारल्याशिवाय राहत नाहीत. तो एकच फटका आपल्याला जमिनीवर आडवे पाडू शकतो. अंटाकर्ि्टक टर्न्स तर आपल्या डोक्यावर टोचच मारतात. त्यामुळे यदाकदाचित असा बाका प्रसंग ओढवल्यास आपली टोपी वॉकिंग स्टिकवर उंच धरावी असे आम्हाला सांगण्यात आले.
साऊथ जॉर्जिया परिसरातील ग्रेट व्हिकन या बेटाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सतराव्या शतकात इंग्लिश कॅप्टन कुक याने दक्षिण ध्रुवाजवळच्या शोध मोहिमेत या ठिकाणी प्रथमच जमीन पाहिल्याने त्या जागेला त्या वेळचा राजा तिसरा जॉर्ज याचे नाव दिले गेले. तेव्हापासून या बेटावर इंग्रजांनी आपला अधिकार जाहीर केला. ग्रेट व्हिकन ही साऊथ जॉर्जियाची राजधानी. या बेटावर अगदीच तुरळक म्हणजे १५-२०
व्हेलिंगच्या जमान्यात या ठिकाणी व्हेल माशांची शिकार मोठय़ा प्रमाणात होत असे. एकदा हे शिकारी आपल्या घरून, युरोपातून निघाले की वर्ष-दीड वर्ष त्यांचे वास्तव्य समुद्रातच. एका वेळी चौदा ते पंधरा माशांची शिकार होत असे. १९०२ साली पहिली स्वीडिश तुकडी व्हेलिंगसाठी इथे आली होती आणि पुढे भल्या मोठय़ा प्रमाणावर शिकार होऊ लागली. त्या वेळची पेट्रल ही बोट इथे तशीच पडलेली आहे. शिकारीकरिता लागणारी सर्व आयुधे, त्यापासून मिळणारे तेल शुद्ध करण्यासाठी रिफायनरी, मांस प्रक्रिया करून वापरण्यास व निर्यातीसाठी योग्य करायला प्रोसेसिंग युनिट या सर्वाची तयारी होती. पण व्हेल माशांमध्ये लक्षणीय घट झाल्याने १९६२ पासून व्हेलच्या शिकारीवर बंदी आली.
आसपासचा २०० कि.मी.चा परिसर मासेमारीकरिता पूर्णपणे बंद आहे. त्यांच्या कोस्ट गार्डची समुद्रात सतत गस्त असते. आता हे सर्व तसेच पडून आहे. त्या सुवर्णकाळात तिथे काम करणाऱ्या मजुरांसाठी राहण्याची, जेवणखाण्याची सोय होती. कारण त्यांना तिथे वर्ष वर्ष राहावे लागे. खेळासाठी फुटबॉल, व्हॉलीबॉलचे ग्राऊंड होते. शिवाय वर्षांतून एकदा मॅरेथॉनची रेस असे. करमणुकीसाठी सिनेमा थिएटर असे. त्याच्या तुलनेत चर्चला हजेरी कमीच असे. मानवी स्वभावच तो. अजूनही उन्हाळ्यात या बेटावर हाफ मॅरेथॉनची रेस असते.
अंटाक्र्टिका खंड शोधण्याच्या दोन अपयशी प्रयत्नांनंतर आपल्या एक्सप्लोरर बोटीतून वीस जणांचा समूह घेऊन वादळवाऱ्याला तोंड देत सहा महिने बर्फावर काढणाऱ्या इंग्लिश सर अर्नेस्ट शाकल्टन यांना इथे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रेट व्हिकन येथे श्ॉकलटन यांच्या समाधीचे दर्शन झाल्यावर व्हिस्की घेऊन टोस्ट करण्याचा शिरस्ता आहे.
ग्रेट व्हिकनच्या भेटीनंतर बोटीवर आयोजित केलेल्या बार्बेक्यूसाठी इंग्लिश अधिकारी व त्याची पत्नी यांना आमंत्रित केले होते. दुपारी ओशनहार्बर येथे लहानशा डोंगरावर हाइक होती. चढण सुरू होण्यापूर्वी उंचावरून पडणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह पार करताना पायाखाली निसरडे दगड असल्याने जरा गडबड होत होती. पावसाचा हलका शिडकावा झाल्याने चढणही मधेमधे निसरडी होती. ते दिव्य पार पडल्यानंतर किनाऱ्यावर आलो तर एलिफंट सीलचा गुरगुराट चालला होता. प्रणयासाठी नर मादीची पाठ सोडत नव्हता.
अंटाकर्ि्टकाच्या परिसरात हवामानाचा कुणीही अंदाज देऊ शकत नाही. अगदी पाच ते दहा मिनिटांत वर्षभरातले सर्व मोसम अनुभवायचे हे एकमेव ठिकाण आहे. त्यामुळे ठरावीक ठिकाणी आपल्याला उतरता येईलच, अशी कुणीही खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे जे पदरात पडेल ते आपले अशीच भावना ठेवून जाणे उचित. ग्रेट व्हिकनप्रमाणेच या परिसरातील गोल्ड हार्बर मुख्य ठिकाण. दुरूनच सूर्यप्रकाशात चमचमणारी बर्फाच्छादित शिखरे पाहून नाव अगदी योग्यच वाटले. उतरण्यासाठी मोक्याची जागा शोधण्यासाठी गेलेल्या स्काउटिंग झोडियाक ग्रुपने सांगितले की, किनारा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एलिफंट, वेडलसील्सनी भरून गेला होता. दुरून दुर्बिणीतून पाहतानासुद्धा त्यांची दाटीवाटी अगदी खडकाळ किनाऱ्याप्रमाणे दिसत होती. उन्हाळ्यात त्यांचा मेटिंगचा काळ असल्याने त्यांना तकलीफ देण्यात अर्थ नसतो; आणि आपल्या तेथे उतरण्याने ते चवताळले तर मग आपली खर नसते. मागल्या वेळेसही आमचे गोल्ड हार्बर तर सोडाच, पण साऊथ जॉर्जियाचे सॅलीसबरीप्लेनशिवाय खराब हवामानामुळे इतरत्र कुठे उतरताच आले नाही. पण या खेपेला आमचे नशीब जोरदार होते. परत दोन दिवस समुद्रावर काढून आम्ही अंटाकर्ि्टकाच्या परिसरात पोहोचलो.
(छायाचित्रे : अनिल बोरकर)
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2014 रोजी प्रकाशित
पर्यटन : साऊथ जॉर्जिया
पांढरेशुभ्र अंग, काळे पंख, टोकदार चोच, मानेजवळ सोनेरी पिसे असलेले पिल्लांचं संगोपन करणारे पेंग्विनच नव्हे तर आपल्या गुरगुराटाने...
First published on: 22-08-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South georgia