वृषभ सर्व ग्रहमान एका नवीन संक्रमणाच्या दिशेने वाटचाल करायला लावणारे आहे. व्यापार-उद्योगामध्ये बाजारातील परिस्थिती आणि तुमची पशांची गरज यामुळे एखादे नवीन धोरण तुम्ही आत्मसात कराल. ज्यांना नोकरीत बदल हवा असेल त्यांनी पावले टाकायला सुरुवात करावी. घरामध्ये तुमचा मूड चांगला असेल. २०१४ सालात तुम्हाला नशिबाचे चढउतार बघायला मिळाले. आपण अजूनही काहीतरी चांगले करू शकलो असतो, अशी भावना मनात ठेवून तुम्ही २०१५ सालात प्रवेश कराल.
मिथुन ग्रहमान तुमचे खर्च वाढवणारे आहे. जे काम आज चालू आहे त्याचे तुम्हाला फारसे महत्त्व नसेल, पण तुमचे लक्ष मात्र पुढील उद्दिष्टांवर केंद्रित झाले असेल. व्यापार-उद्योगात देणी देण्याला प्रथम प्राधान्य द्याल. नोकरीमध्ये कामात झालेला आळस वरिष्ठांना आवडणार नाही. घरामध्ये न टाळता येणारे खर्च वाढतील. २०१४ सालात सांसारिक चिंता त्रासदायक ठरल्या. २०१५ सालात प्रवेश करताना ग्रहस्थिती फारशी उत्साहवर्धक नाही. त्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना त्याचे काय परिणाम होतील याचा नीट विचार कराल.
कर्क नेहमीच्या कामामध्ये तुम्ही इतके गढून गेलेले असता की त्या वेळी तुम्हाला इतर कशाचीच आठवण येत नाही. या आठवडय़ात तुमचा मूड मौजमस्तीचा असेल. नोकरी-व्यवसायातील आवश्यक ती कर्तव्ये पार पाडाल. घरामध्ये सक्रिय बनाल. सामूहिक कामामध्ये पुढाकार घ्याल. २०१४ सालाच्या सुरुवातीला तुमची ग्रहस्थिती फारशी चांगली नव्हती. कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे आत्मविश्वास कमी झाला होता. आता नवीन वर्षांत पदार्पण करताना तुम्ही पुन्हा एकदा आनंदी आणि आशावादी दिसाल.
सिंह समोरच्या व्यक्तींशी गोडीगुलाबीने वागा. नाहीतर मानापमानाचे प्रसंग निर्माण होतील. व्यापार-उद्योगात जागेची सजावट, आधुनिकीकरण यांकरता पसे खर्च होतील. पण उत्पन्न चांगले राहील. नोकरीमध्ये सहजगत्या जमतील तेवढीच कामे करावीत. घरामध्ये मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याबरोबर हसतखेळत वेळ घालवाल. २०१४ सालाच्या सुरुवातीला तुम्ही महत्त्वाकांक्षी होता. आता नवीन वर्षांत प्रवेश करताना तुमच्या मर्यादांचा विचार करा आणि नंतरच सर्व बेत ठरवा, असा ग्रहांचा तुम्हाला इशारा आहे.
कन्या ग्रहमान महत्त्वाच्या घटनांची नांदी करणारे आहे. नेहमीच्या जीवनपद्धतीत तुम्ही खूश असता. या आठवडय़ात मात्र तुम्हाला तुमच्या पद्धतीने आणि वेगळे काम केलेले आवडेल. व्यापार आणि उद्योगातील कामकाज चांगले राहील. नोकरीमध्ये तुम्हाला चांगल्या व्यक्तींचा सहवास लाभेल, पण त्यांचे मूड सांभाळणे अवघड जाईल. २०१४ सालाच्या सुरुवातीला तुमच्यावर काही मर्यादा आल्या होत्या. आता नवीन वर्षांत पदार्पण करताना गुरू आणि शनी या दोन्ही ग्रहांची तुम्हाला चांगली साथ मिळेल.
तूळ दैनंदिन जीवनाचा तुम्हाला कंटाळा आल्याने त्यामध्ये काहीतरी वेगळे करण्यासाठी तुम्ही एखादी अफलातून कल्पना शोधाल. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. व्यवसाय-उद्योगात एखादी मीटिंग, कॉन्फरन्स वगरे गोष्टींचा तुमच्यावरती बराच प्रभाव असेल. २०१४ सालाच्या सुरुवातीला मंगळ व शनीच्या भ्रमणामुळे तुम्हाला खूपच तणाव आला होता, पण गुरूने तुम्हाला मनोधर्य दिले. आता २०१५ सालात प्रवेश करताना तुमची ग्रहस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असल्याने तुमची उमेद वाढणार आहे.
वृश्चिक विशिष्ट कालावधीनंतर ग्रहांची मांडणी बदलल्यामुळे आपल्या आचारविचारात संक्रमण होत असते. या आठवडय़ामध्ये काळाची गरज म्हणून तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीत बदल करणे क्रमप्राप्त होईल. एकंदरीत कामकाज मनाप्रमाणे राहील. या वर्षांच्या सुरुवातीला गुरू आणि शनी या ग्रहांचे भ्रमण तुम्हाला चांगले नव्हते, आता गुरू अनुकूल झाला आहे, पण शनी राशीत आल्यामुळे तुमची चिंता वाढली. थोडक्यात, एकंदरीत भविष्याचा विचार केला तर मागच्या पानावरून पुढे असाच प्रकार असणार आहे.
धनू दीर्घकाळानंतर तुमच्या आनंदी आणि स्वच्छंदी स्वभावाला पूरक असे वातावरण लाभणार आहे. त्याचा तुम्ही फायदा उठवाल. कामाच्या वेळी काम करून इतर वेळी मौजमजा कराल. घरामध्ये प्रिय व्यक्तींसमवेत वेगवेगळे कार्यक्रम ठरवाल आणि पार पाडाल. २०१४ सालाची सुरुवात तुमच्या मनाप्रमाणे झाली, पण जूननंतर हळूहळू वातावरण प्रतिकूल झाल्यामुळे आता नवीन वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. नवीन वर्षांत प्रवेश करताना ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असा पवित्रा ठेवा.
मकर नेहमीच्या जीवनात तुम्हाला फारसे स्वारस्य वाटणार नाही. त्याऐवजी काहीतरी वेगळे आणि सनसनाटी घडावे असा तुमचा मानस असेल. नोकरीत कामाचा कंटाळा येईल. घरगुती मेळावा स्नेहसंमेलन प्रवास यामुळे तुमचा वेळ मजेत जाईल. २०१४ सालाच्या सुरुवातीला गुरू तुम्हाला अनुकूल नव्हता, पण शनीने तुम्हाला साथ दिली. त्यानंतर एकदम उत्साही बनलात. आणि तुमच्या यशाचे प्रमाण वाढले. आता २०१५ सालात पदार्पण करताना तुम्हाला काही तरी भव्यदिव्य करून भरपूर कमाई करावीशी वाटेल.
कुंभ तुमच्या बुद्धीला सतत काहीतरी खाद्य लागते. तसे ते मिळाल्यामुळे तुम्ही खूश असाल. व्यवसाय-उद्योगात जुन्या कार्यपद्धतीला रामराम ठोकण्याचा संकल्प कराल. नोकरीमध्ये स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. तुमचा मूडही स्वच्छंदी आणि आनंदी असेल. २०१४ सालाच्या सुरुवातीला गुरू, शनी आणि मंगळ या ग्रहांनी तुम्हाला चांगली साथ दिली. नंतर तुमचा उत्साह थोडा कमी झाला. २०१५ सालात प्रवेश करताना हाच शनी तुम्हाला जिद्द आणि ईर्षां टिकवून ठेवायला उपयोगी पडणार आहे.
मीन एका नवीन अध्यायाची नांदी होण्याची शक्यता आहे. जी खडतर वाटचाल तुम्ही पार केली, त्याचे चांगले फळ आता नजरेच्या टप्प्यात येईल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्यावर झालेल्या अन्यायाचे निराकरण करतील. घरामध्ये शुभकार्यक्रम पार पडेल. २०१४ सालाच्या सुरुवातीला तुमची ग्रहस्थिती अगदीच खराब होती. परंतु जूननंतर त्यात सुधारणा झाली. संपूर्ण वर्ष तणावात गेले. २०१५ सालात प्रवेश करताना तुम्ही खूप आनंदी, उत्साही आणि आशावादी दिसणार आहात.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2014 रोजी प्रकाशित
२६ डिसेंबर २०१४ ते १ जानेवारी २०१५
मेष ग्रहमान तुमच्यातील उत्साही वृत्ती जागृत करणारे आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे काम तुम्हाला करावेसे वाटेल.

First published on: 26-12-2014 at 12:35 IST
मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Your horoscope for year