मुंडेंकडे ‘फक्त’ ३८ कोटी
बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याकडे ३८ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले आहे. ६६ वर्षीय मुंडे यांनी आपण तसेच आपल्या कुटुंबाकडे ३८ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे.
शिंदे यांची  मालमत्ता‘केवळ’ २३.४७ कोटींची
सोलापूर राखीव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कौटुंबिक मालमत्ता २३ कोटी ४७ लाखांची असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. त्यांच्या पत्नी उज्ज्वला  यांना रोहा येथे बांधकामासाठी जावयाने पाच कोटींची भेट दिल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.
मोहिते-पाटील कुटुंबीयांची मालमत्ता ‘अवघी’ १७ कोटींची
माढा लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांकडे १७ कोटींची मालमत्ता असून यात ६ कोटी ७५ लाखांची जंगम, तर १० कोटी २७ लाखांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे. ४० वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेत राहणारे मोहिते-पाटील यांच्याकडे स्वमालकीची मोटारही नाही.